

Mars Rock Auction NWA 16788 World’s largest Mars meteorite Sotheby price Biggest space rock on Earth found in Niger
न्यूयॉर्क : खगोलप्रेमींना आणि विज्ञानप्रेमींना भुरळ घालणाऱ्या एका ऐतिहासिक घटनेने पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. पृथीवर सापडलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा मंगळग्रहीय उल्कापिंड – NWA-16788 – येत्या 16 जुलै रोजी न्यूयॉर्कमधील सॉथबीजच्या लिलावात विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे.
या खडकाला अंदाजे 4 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 33 कोटी रुपये) इतकी किंमत मिळू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
NWA-16788 नावाचा हा अद्भुत उल्कापिंड 24.67 किलो (54.39 पाउंड) वजनाचा असून, याआधीचा विक्रमधारक Taoudenni 002 (14.51 किलो) पेक्षा अधिक मोठा आहे. तो नोव्हेंबर 2023 मध्ये नायजरच्या अगादेझ प्रदेशात एका उल्काशोधकाने शोधून काढला.
हा भाग आधीपासूनच डायनासोरचे जीवाश्म सापडल्याने प्रसिद्ध आहे, पण आता अंतराळातून आलेल्या या खडकामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
नंतर त्याचा नमुना शांघाय खगोलशास्त्र संग्रहालय येथे तपासणीसाठी पाठवला गेला. या खडकाचे नमुने शांघाय खगोलशास्त्र संग्रहालय (Shanghai Astronomy Museum) येथे तपासण्यात आले आणि त्याचा मंगळ ग्रहाशी संबंधित असल्याचे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले.
Sotheby’s च्या माहितीनुसार, NWA 16788 ही एक "अत्यंत दुर्मिळ" घटना आहे. पृथीवर सापडलेल्या 77000 हून अधिक उल्कापिंडांपैकी केवळ 400 मंगळावरून आलेले आहेत.
त्यांचे एकत्रित वजन 825 पाउंड (सुमारे 374 किलो) आहे. त्यापैकी NWA-16788 हा एकटाच 6.5 टक्के हिस्सा व्यापतो. ही बाबच त्याच्या अनमोलतेची साक्ष देते.
हा खडक मंगळ ग्रहावर एका प्रचंड उल्कापिंडाच्या धडकेत उडून अंतराळात फेकला गेला आणि 14 कोटी मैलांचे अंतर पार करून शेवटी सहारा वाळवंटात येऊन आदळला.
याच्या पृष्ठभागावर दिसणाऱ्या रेग्माग्लिप्ट्स (घर्षणामुळे निर्माण झालेल्या खाचाखोचा) आणि त्यावरील रक्तसरसर रंगाची 'फ्यूजन क्रस्ट' ही त्याच्या अंतराळयात्रेची साक्ष आहे.
हा उल्कापिंड अगदी नवीन आहे. त्यामुळे त्याचे रासायनिक गुणधर्म जवळपास अपरिवर्तित राहिले आहेत. यामध्ये सुमारे 21.2 टक्के मास्केलिनाईट ग्लास आहे. हा एक विशेष घटक म्हणजे आहे.
ते एक प्रकारचं काचेसारखं खनिज आहे, जे मंगळावर उल्कापिंडाच्या तीव्र धडकेत निर्माण झालं होतं. शास्त्रज्ञांच्या मते, मंगळावर फक्त 19 खड्डे इतक्या मोठे आहेत की जिथून असे खडक अंतराळात उडून जाऊ शकतात.
जरी अनेक संग्राहक आणि विज्ञानसंस्था या मंगळावरील उल्कापिंडासाठी उत्सुक असल्या, तरी काही शास्त्रज्ञांनी त्याची खाजगी लिलावामार्फत विक्री करण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. हा उल्कापिंड संग्रहालयांपेक्षा खाजगी संग्राहकांकडे जाईल की काय, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
काही वैज्ञानिक आणि अभ्यासकांनी म्हटलं आहे की असा अमूल्य नमुना सार्वजनिक संग्रहालयात पाहण्यासाठी ठेवला पाहिजे.
स्कॉटलंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबरा येथील पुराजीवशास्त्रज्ञ प्रा. स्टीव्ह ब्रुसाटे यांच्या मते, “जर हा उल्कापिंड एखाद्या धनाढ्याच्या तिजोरीत गेला, तर ती दु:खद गोष्ट असेल. याला संग्रहालयात ठेवलं पाहिजे – जिथे मुले, कुटुंबं आणि सामान्य जनता याचा अभ्यास करू शकतील व आनंद घेऊ शकतील.”