
Japan volcano eruption 2025 Mount Shinmoedake eruption Japan earthquake July 5 Baba Vanga Ryo Tatsuki manga prediction
टोकियो : जपानमधील क्युषू बेटावरील माउंट शिनमुएदाके (Mount Shinmoedake) या ज्वालामुखीत बुधवारी अचानक मोठा उद्रेक झाला. जपानच्या हवामान विभागाच्या मते, ज्वालामुखीतून रात्रीच्या सुमारास 3000 मीटर उंच राख आणि धुराचे लोट हवेत झेपावले. यामुळे स्थानिक प्रशासनाने पर्वताजवळ जाणे टाळण्याचा इशारा दिला आहे.
या घटनेनंतर सोशल मीडियावर चर्चेचा जोर वाढला आहे. यामागे आहे जपानी मंगा आर्टिस्ट रियो तात्सुकी हिच्या भविष्यवाणीची पार्श्वभूमी आहे. रियो यांची तुलना अनेकदा बल्गेरियन भविष्यवक्ता बाबा वंगा हिच्याशी केली जाते. 2025 मध्ये जपानमध्ये मोठी नैसर्गिक आपत्ती येईल, असा दावा या मंगा यांनी त्यांच्या पुस्तकात केला होता.
ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर लगेचच दक्षिण क्युषूमध्ये 5.5 तीव्रतेचा भूकंप झाल्याची नोंद झाली. या परिसरात गेल्या दोन आठवड्यांत 1000 पेक्षा जास्त छोटे-मोठे भूकंप झाल्याचे हवामान विभागाने सांगितले. परिणामी, काही दुर्गम बेटांवरील रहिवाशांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
सरकारने पुढील भूकंपांची शक्यता व्यक्त केली असली तरी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जनतेला केले आहे.
रियो तात्सुकीने जरी 5 जुलै 2025 च्या आपत्तीविषयी स्पष्टपणे भविष्यवाणी केली नसली, तरी सोशल मीडियावर याच तारखेशी घडलेल्या घटनांची सांगड घालण्यात येत आहे.
या अफवांचा जपानमधील पर्यटनावरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. एप्रिल 2025 मध्ये जपानमध्ये तब्बल 3.9 दशलक्ष पर्यटकांनी भेट दिली होती, परंतु मे महिन्यात या संख्येत घसरण झाली.
EGL Tours या हाँगकाँगस्थित ट्रॅव्हल कंपनीचे स्टीव्ह ह्युएन यांनी सांगितले की, “या अफवांमुळे आमच्या जपानशी संबंधित व्यवसायावर जवळपास 50 टक्के परिणाम झाला आहे.”
रियो तात्सुकी यांनी यापूर्वीही 2011 च्या भूकंप आणि त्सुनामीसारखी आपत्ती सूचित केली होती, असा दावा काही वाचकांनी केला आहे. मात्र स्वतः तात्सुकीने या भविष्यातील घटना “काल्पनिक स्वप्नावर आधारित” असल्याचे स्पष्ट केले आहे.
तरीही, जपानमध्ये सध्या निर्माण झालेलं नैसर्गिक घटनांचं सत्र आणि मंगाच्या कथानकातील साम्य यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम व भीती आहे.
जपान सरकार आणि हवामान विभाग सतर्क असून, नागरिकांनी अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करत आहेत. कोणत्याही अनधिकृत माहितीच्या आधारे निर्णय घेण्याचे टाळण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
दरम्यान, सध्या जपानमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, भूकंप, आणि सोशल मीडियावर पसरलेल्या भविष्यवाण्यांनी एक अनिश्चिततेचं वातावरण निर्माण केलं आहे.