

Hamas Releases All 20 Israeli Hostages : Gaza ceasefire: हमासने सोमवारी सर्व २० जिवंत इस्रायली बंधकांना गाझामधील रेड क्रॉस प्रतिनिधींना सुपूर्द केले आहे. सात आणि १३ अशा दोन गटांमध्ये ओलिसांची सुटका करण्यात आली. १३ बंधकांच्या दुसऱ्या गटाला दक्षिण गाझा पट्टीतील खान युनूस येथे हलवण्यात आले आहे, अशी माहिती इस्रायलच्या सैन्य दलाने आज (१३ ऑक्टोबर) एक्स पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. दरम्यान, इजिप्त, कतार आणि अमेरिकेने आंतरराष्ट्रीय स्तरावर मध्यस्थी केलेल्या युद्धबंदी आणि देवाणघेवाणीच्या करारानंतर ओलीस नागरिकांची सुटका झाली आहे.
हमासने सर्व २० इस्रायली बंधकांना सोडले आहे. त्यांना सात आणि १३ अशा दोन तुकड्यांमध्ये सोडण्यात आले. हमासने त्यांना रेड क्रॉसकडे सोपवले. पहिल्या तुकडीतील सात बंधक इस्रायलमध्ये पोहोचले आहेत, तर दुसरी तुकडी त्यांच्या मार्गावर आहे. हमासमध्ये आता एकही जिवंत इस्रायली बंधक नाही. हमास आज २८ इस्रायलींचे मृतदेहही सोपवेल. त्या बदल्यात इस्रायलने २५० पॅलेस्टिनी कैद्यांना सोडेल.इस्रायली लष्कराने सांगितले की सर्व आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील इस्रायलमध्ये पोहोचले आहेत. बेंजामिन नेतान्याहू स्वतः त्यांचे स्वागत करण्यासाठी बेन गुरियन विमानतळावर पोहोचले. ट्रम्प लवकरच इस्रायली संसदेत भाषण करतील.
बंधकांच्या नातेवाईकांच्या मुख्य संघटने आणि हमासच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी गाझामधील त्यांच्या कुटुंबियांशी व्हिडिओ कॉल केले. होस्टेज अँड फॅमिली फोरमने मतान झांगौकर, निमरोद कोहेन आणि एरियल आणि डेव्हिड कुनियो यांच्या नातेवाईकांचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बेन गुरियन विमानतळावरून निघतील आणि ४० मिनिटांचा प्रवास करून जेरुसलेमला जातील, जिथे ते बंधकांच्या कुटुंबियांना भेटतील आणि इस्रायली संसदेच्या नेसेटच्या विशेष सत्रात संबोधितही करणार आहेत.
तेल अवीवच्या बेन गुरियन विमानतळावर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वागत करण्यात आले. इस्रायली राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग आणि त्यांच्या पत्नी मिचल हर्झोग आणि पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांच्या पत्नी सारा नेतान्याहू हे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर उपस्थित होते.
इजिप्त, कतार आणि अमेरिकेने आंतरराष्ट्रीय स्तरावर मध्यस्थी केलेल्या युद्धबंदी आणि देवाणघेवाणीच्या करारानंतर ओलीस नागरिकांची सुटका झाली आहे. सुटका करण्यात आलेल्या सात बंधकांमध्ये गली आणि झिव्ह बर्मन, माटन अँग्स्ट, अलोन ओहेल, ओम्री मीरान, एटन मोर आणि गाय गिल्बोआ-दलाल यांचा समावेश आहे.