इस्‍त्रालय-हमास युद्धाबंदीचे संकेत! पंतप्रधान नेतान्याहूंनी घेतला मोठा निर्णय

'मोसाद'च्‍या संचालकांना युद्धबंदीच्या वाटाघाटींसाठी दिली परवानगी
Israel–Hamas war
Israel–Hamas war : मागील दीड वर्षाहून अधिक काळ इस्रायल आणि हमासमधील रक्‍तरंजित संघर्ष अजुनही सुरुच आहे. (फाईल फाेटाे)File photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मागील दीड वर्षाहून अधिक काळ इस्रायल आणि हमासमधील रक्‍तरंजित संघर्ष अजुनही सुरुच आहे. इस्रायली सैन्य गाझावर सातत्‍याने हवाई हल्‍ले करत आहे. इस्रायलने हमासच्या दोन म्‍होरक्‍यांचाही खात्‍मा केला आहे. तरीही दहशतवाद्यांनी इस्रायली सैन्यासमोर पराभव स्वीकारलेला नाही. अशा परिस्थितीत आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. गुप्‍तचर संघटना मोसादच्या संचालकांना कतारमध्ये युद्धबंदीच्या वाटाघाटींसाठी पाठवण्‍यास पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी परवानगी दिली आहे, असे वृत्त 'एपी'ने दिले आहे. ( Israel–Hamas war )

इस्रायलने घेतला मोठा निर्णय

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धासंदर्भात गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धबंदी चर्चेत प्रगती झाल्याचे संकेत इस्रायलकडून मिळत आहेत. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी त्यांच्या गुप्तचर संस्थेच्या 'मोसाद' संचालकांना युद्धबंदीच्या वाटाघाटींसाठीच्‍या पुढील टप्प्यातील चर्चेसाठी पुढे येण्याची परवानगी दिली आहे. इस्रायल-हमास युद्ध थांबवण्याच्या दिशेने नेतान्याहू यांचे हे पाऊल आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल मानले जात आहे.

टप्प्याटप्प्याने युद्धबंदीची चर्चा

टप्प्याटप्प्याने युद्धबंदीची चर्चा सुरु करर्णंयाचे संकते इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी यांनी दिले आहेत. मात्र आम्‍ही फक्त पहिल्या टप्प्यातील चर्चेसाठी वचनबद्ध आहेत, एका आठवड्याच्या लढाईच्या विरामाच्या बदल्यात ओलिसांची अंशतः सुटका करण्‍यात यावी, अशी मागणी त्‍यांनी हमासकडे केली आहे. तर मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झालेल्या प्रदेशातून इस्रायली सैन्याची संपूर्ण माघार घेण्याचा आग्रहावर हमास ठाम आहे; परंतु नेतन्याहू यांनी गाझामध्ये हमासची लढाई करण्याची क्षमताच नष्ट करणार असल्‍याचा निर्धार केला आहे. मात्र गुप्‍तचर संघटना मोसादच्या संचालकांना कतारमध्ये पाठवण्‍यास पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी परवानगी दिल्‍याने युद्धबंदीच्या वाटाघाटी सुरु हाेण्‍याचे संकेत मिळत आहेत.दरम्‍यान, गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने नुकतेच सांगितले की, युद्धात आतापर्यंत ४६,००० हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. मृतांत बहुतांश महिला आणि मुले आहेत.

मोसादचे संचालक डेव्हिड बार्निया दोहाला भेट देणार

मोसादचे संचालक डेव्हिड बार्निया इस्रायल आणि हमास यांच्यातील चर्चा कतारची राजधानी दोहा येथे केव्‍हा होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रिपोर्टनुसार, आता उच्चस्तरीय इस्रायली अधिकारी या चर्चेत सहभागी होतील. याआधीही काही काळासाठी युद्धबंदीवर सहमती झाली होती;पण ती युद्धच्या वाटाघाटी सुरुवातीच्या आठवड्यात हाेती; पण तेव्हापासून अमेरिका, इजिप्त आणि कतारसह अनेक देशांच्या मध्यस्थीखाली चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या मात्र सर्व बैठका निष्‍फळ ठरल्‍या आहेत.

युद्धबंदीमुळे १०० हून अधिक ओलिसांची सुटका

७ ऑक्‍टोबर २०२३ रोजी हमासने इस्‍त्रायलवर हल्‍ला केला. या हल्‍ल्‍यात इस्‍त्रायलचे १२०० नागरिक ठार झाले.सुमारे २५० लोकांना गाझामध्ये ओलीस ठेवले.यातील सुमारे १०० इस्‍त्रायली नागरिक अजूनही गाझामध्ये आहेत. लवकरात लवकर युद्धबंदीच्या वाटाघाटी पूर्ण करुन ओलीसांच्‍या सुटका करावी, अशी मागणी त्‍यांचे कुटुंबीय नेतन्याहू यांच्याकडे करत अहेत. दरम्‍यान, हमासने म्हटले आहे की, अनेक महिन्यांच्या युद्धानंतर किती ओलीस जिवंत आहेत हे निश्चित नाही. इस्रायलच्या लष्कराने शनिवारी उत्तर गाझामध्ये चार सैनिकांच्या मृत्यूची घोषणा केली, परंतु तपशीलवार माहिती दिली नाही. या युद्धात किमान ४०० सैनिक मारले गेले आहेत. इस्रायलने पुन्‍हा एकदा गाझामधील हवाई हल्‍ले वाढवले आहेत. इस्रायली सैन्याने युद्धादरम्यान १७,००० हून अधिक दहशतवाद्यांना ठार केल्‍याचा दावा केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news