US Presidential Elections 2024 | ट्रम्प यांच्यासमोर मोठे आव्हान, ओबामांचा कमला हॅरिस यांना पाठिंबा

ट्रम्प यांच्या पराभवासाठी डेमोक्रॅटिक पक्षाने आखली रणनिती
US Presidential Elections 2024 Kamala Harris
बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी कमला हॅरिस यांना पाठिंबा दर्शवला आहे.(Image - X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी (US Presidential Elections 2024) कमला हॅरिस (Kamala Harris) यांना पाठिंबा दिला आहे. दोघांनी शुक्रवारी एक व्हिडिओ जारी करत कमला हॅरिस यांच्या उमेदवारीचे समर्थन केले. त्यांनी जारी केलेल्या व्हिडिओनुसार, बराक ओबामा (Former US President Barack Obama) आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा (Michelle Obama) यांनी कमला हॅरिस यांना फोन कॉलवर सांगितले की, "मिशेल आणि मी तुम्हाला पाठिंबा देताना अधिक अभिमान बाळगू शकत नाही आणि या निवडणुकीत तुम्हाला विजय मिळवून देण्यासाठी आम्हाला जे काही करता येईल ते आम्ही करू."

दरम्यान, हॅरिस यांनी ओबामांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले आहे आणि त्यांच्या दशकभराच्या मैत्रीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान, ओबामांनी हॅरिस यांना पाठिंबा जाहीर केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर आव्हान वाढले आहे.

अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी २०२४ च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतून (US Elections 2024) नुकतीच माघार घेतली. गेल्या रविवारी त्यांनी तसे जाहीर केले. तर माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर त्यांना अमेरिकेच्या जनतेकडून मोठ्या प्रमाणात सहानभूती मिळताना दिसत आहे. दरम्यान, बायडेन यांच्या निवडणुकीतून माघार घेण्याच्या घोषणेनंतर कमला हॅरिस यांना डेमोक्रॅट्सच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून समर्थन देण्यात आले होते. आता बराक ओबामा यांनी हॅरिस यांच्या उमेदवारीवर शिक्कमोर्तब केले आहे.

US Presidential Elections 2024 Kamala Harris
बायडेन यांची माघार!

मला हॅरिस यांचा अभिमान वाटतो - मिशेल ओबामा

"अरे देवा, मिशेल, बराक हे माझ्यासाठी खूप मोठे आहेत. मी तुम्हा दोघांच्या सहकार्यासाठी खूप उत्सुक आहे.," असे उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी म्हटले आहे. तर मिशेल ओबामा म्हणाल्या की, मला हॅरिस यांचा अभिमान वाटतो आणि आगामी निवडणूक ऐतिहासिक असेल अशी अपेक्षा आहे. “कमला, मला तुमचा अभिमान आहे हे सांगितल्याशिवाय मी हा फोन करू शकत नाही. निवडणूक ऐतिहासिक ठरेल,” असे त्यांनी हॅरिस यांना सांगितले.

जो बायडेन यांची माघार

निवडणुकीपूर्वी झालेल्या अध्यक्षीय वादविवादात डोनाल्ड ट्रम्प जो बायडेन यांच्यावर भारी पडले. त्यानंतर बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. वादविवादादरम्यान ट्रम्प यांच्या तुलनेत बायडेन कमी पडल्याने अनेक डेमोक्रॅटच्या खासदारांनी बायडेन यांना राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतून माघार घेण्याचा आग्रह केला. त्यानंतर लगेच बायडेन तसे अधिकृत जाहीर करुन टाकले.

US Presidential Elections 2024 Kamala Harris
US Elections 2024 Joe Biden | जो बायडेन यांनी अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार का घेतली?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news