US Elections 2024 Joe Biden | जो बायडेन यांनी अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार का घेतली?

बायडेन यांचे शेवटच्या क्षणी झाले मनपरिवर्तन
US Elections 2024 Joe Biden
जो बायडेन यांनी २०२४ च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतून रविवारी अचानक माघार घेतली.(Image- X)

पुढारी ऑनलाईन डेस्क

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी २०२४ च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतून (US Elections 2024) अचानक माघार घेतली. रविवारी त्यांनी तसे जाहीर केले. तर माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर त्यांना अमेरिकेच्या जनतेकडून मोठ्या प्रमाणात सहानभूती मिळताना दिसत आहे. दरम्यान, बायडेन यांच्या निवडणुकीतून माघार घेण्याच्या घोषणेनंतर कमला हॅरिस यांना डेमोक्रॅट्सच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून समर्थन देण्यात आले आहे.

निवडणुकीपूर्वी झालेल्या अध्यक्षीय वादविवादात डोनाल्ड ट्रम्प जो बायडेन यांच्यावर भारी पडले. त्यानंतर बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. रिपब्लिकन पक्षाने राष्ट्राध्यक्ष म्हणून आणखी एक कार्यकाळ पूर्ण करण्यास त्यांच्याबाबत असहमती दर्शवली. वादविवादादरम्यान ट्रम्प यांच्या तुलनेत बायडेन कमी पडल्याने अनेक डेमोक्रॅटच्या खासदारांनी बायडेन यांना राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतून माघार घेण्याचा आग्रह केला. त्यानंतर लगेच बायडेन तसे अधिकृत जाहीर करुन टाकले.

US Elections 2024 Joe Biden
American President Election : डेमोक्रॅटच्या उमेदवार कमला हॅरिस? जो बायडन यांनी दिला पाठिंबा

बायडेन यांची व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, बायडेन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतून माघार घेत असलेल्या निर्णयाची पहिल्यांदा माहिती उपाध्यक्ष कमला हॅरिस मिळाली. बायडेन यांनी व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ जेफ जिएंट्स आणि त्यांच्या प्रचार प्रमुख जेन ओ'मॅली डिल्लन यांच्याशी वैयक्तिक बैठका घेतल्या. जिएंट्स यांनी रविवारी दुपारी १:४५ वाजता बायडेन यांच्या प्रचार मोहिमेतील कर्मचारी आणि व्हाईट हाऊसच्या कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली होती; जेणेकरून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष त्यांना त्यांच्या निर्णयाबद्दल माहिती देऊ शकतील. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास चीफ ऑफ स्टाफने व्हाईट हाऊसच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांसमोर या संदर्भातील औपचारिक घोषणा केली.

व्हाईट हाऊसचे काउन्सिलर स्टीव्ह रिचेट्टी, वरिष्ठ प्रचार सल्लागार माइक डोनिलॉन, डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ ॲनी टोमासिनी आणि फर्स्ट लेडी अँथनी बर्नाल यांचे वरिष्ठ सल्लागार आदी राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी होते. या सर्वांच्या उपस्थितीत बायडेन यांनी रविवारी आपला निर्णय जाहीर केला, असे वॉशिंग्टन पोस्टने पुढे वृत्तात म्हटले आहे.

बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतून माघार का घेतली?

अमेरिकेत जूनमध्ये झालेल्या पहिल्या अध्यक्षीय वादविवादात राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभूत केले होते. चार वर्षांपूर्वी झालेल्या अशाच झालेल्या वादविवादात बायडेन यांनी ट्रम्प यांना पराभूत केले होते. त्याचा जणू सूड उगवत ट्रम्प यांनी बायडेन यांना वादविवादात हरवले. या पहिल्या अध्यक्षीय वादविवादानंतर बायडेन यांच्यावर राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतून माघार घेण्याबाबत सूर व्यक्त करण्यात आला. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या कामगिरीसाठी जेट लॅग आणि आंतरराष्ट्रीय प्रवास, रँकला जबाबदार धरले, तर डेमोक्रॅट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पुन्हा राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचे आवाहन केले होते.

बायडेन यांना त्यांच्या पक्षातून विरोध

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात बायडेन यांना त्यांच्या पक्षातूनच जोरदार विरोध झाला. विशेषतः ३६ काँग्रेस डेमोक्रॅट्समध्ये आठपैकी एकापेक्षा डेमोक्रॅट्सनी बायडेन यांच्या बौद्धिक क्षमतेबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची मागणी केली होती. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी बायडेन यांनी पुन्हा राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यावरून नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी असे म्हटले की त्यांना भीती आहे की जर अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष पुन्हा निवडून आले तर त्यांना केवळ व्हाईट हाऊसच नाही तर पुढच्या वर्षी काँग्रेसच्या दोन्हीपैकी एका सभागृहावरील नियंत्रण ठेवण्याची संधीही गमवावी लागू शकते.

US Elections 2024 Joe Biden
Joe Biden : अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांच्या निवडणुकीतून जो बायडन यांची माघार

बायडेन यांचे शेवटच्या क्षणी कसे झाले मनपरिवर्तन?

सूत्रांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले आहे की बायडेन यांचे “शेवटच्या क्षणी मनपरिवर्तन” झाले. कारण शनिवारी रात्रीपर्यंत त्यांचा राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा कोणताही हेतू नव्हता. बायडेन यांनी रविवारी दुपारी त्यांच्या वरिष्ठ सल्लागारांसोबत अनेक बैठका घेतल्यानंतर त्यांचा निर्णय बदलला आणि त्यांनी निवडणुकीत माघार घेतली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news