1200 km daily travel: नोकरीसाठी रोज १२०० किलोमीटरचा प्रवास.... आता इंजिनिअरची अवस्था आहे अत्यंत खराब
1200 km daily travel: अमेरिकेचा एक इंजिनिअरची कहानी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा इंजिनिअर रोज ऑफिसला जाण्यासाठी तब्बल १२०० किलोमीटरचा प्रवास करत होता. यात विमान, रस्ता आणि रेल्वे या तीनही मार्गांचा वापर करत होता. त्याचा हा जॉबसाठीचा प्रवास एखाद्या मॅरेथॉन सारखाच आहे. मात्र अमेरिकेसारख्या प्रगत देशात एखाद्या इंजिनिअरला जॉबसाठी रोज १२०० किलोमीटर प्रवास का करावा लागत होता. चला जाणून घेऊयात....
CNBC च्या एका रिपोर्टनुसार अमेरिकेतील या इंजिनिअर्सच्या सुपर कम्युटिंगची जोरदार चर्चा सुरू आहे. हा इंजिनिअर रोज ऑफिसला जाण्यासाठी विमान, ड्राईव्ह आणि ट्रेनचा असा मिळून १२०० किलोमीटरचा प्रवास करत होता. हा प्रवास त्याच्या खिशावर चांगलाच भारी पडत होता. तसंच या दीर्घ प्रवासाचा त्याच्या प्रकृतीवर देखील परिणाम करत होता.
कसा सुरू झाला प्रवास?
३१ वर्षाचे अँड्र्यू रेंडन त्यांच्या पत्नीसोबत न्यू जर्सीमध्ये रहात होते. मात्र तिथं घर खरेदी करणं त्यांच्या बजेटच्या बाहेर होतं. त्यातच त्यांच्या पत्नीला नॉर्थ कॅरोलिनामध्ये नोकरी मिळाली. यानंतर हे दोघे तिथं शिफ्ट झाले. मात्र रेंडन यांची नोकरी अजूनही न्यू जर्सीमध्येच होती. त्यांना आठवडाभर ऑफिसमधून काम करणं गरजेचं होतं. इथूनच रोजचा १२०० किलोमीटरचा प्रवास सुरू झाला.
थकवणारा प्रवास
रेंडन सकाळी २ वाजता उठायचे. त्यानंतर २.५ वाजता ते ड्राईव्ह करून रॅलेग एअरपोर्टवर पोहचले. तेथून ते स्वस्तातील फ्लाईट पकडून न्यू जर्सीला जात होते. हे उड्डाण जवळपास २ ते ५ तासाचे असायचे. यानंतर ते ट्रेनने ऑफिसमध्ये पोहचायचे.
संध्याकाळपर्यंत ऑफिसमध्ये काम केल्यानंतर ते हॉटेलमध्ये थांबायचे त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी फ्लॅईट पकडून नॉर्थ कॅरोलिनाला परतत होते. हा असा थकवणारा प्रवास ते सगल १० महिने करत होते.
खिसा व्हायचा रिकामा
या प्रवासाचा खर्च सुरूवातीला १२०० डॉलर म्हणजे जवळपास १ लाख रूपये येत होता. मात्र हळूहळू हा वाढून १८०० ते २००० डॉलर म्हणजे जवळपास दीड ते १.६८ लाख रूपयांपर्यंत पोहचला. या खर्चात पेट्रोल, विमानाचं तिकीट, हॉटेल भाडं यांचा समावेश होता. सतत प्रवास केल्यामुळं रेडन यांना निद्रानाशाचा त्रास सुरू झाला. ते सतत आजारी पडू लागले. त्यांची प्रकृती सतत बिघडू लागली.
पगार कमी करून बदलली नोकरी
सततच्या १२०० किलोमीटरच्या प्रवासाला कंटाळून अखेर रेंडन यांनी आपली नोकरी बदलली. त्यांनी नॉर्थ कॅरोलिनामध्ये नोकरी शोधायला सुरूवात केली. मात्र सध्याच्या जॉब मार्केटच्या खराब स्थितीमुळं त्यांना चांगली नोकरी सहजासहजी मिळाली नाही. शेवटी त्यांना वर्षाला ४० हजार डॉलर्सचं नुकसान करून नॉर्थ कॅरोलिनामध्ये आपल्या घराजवळ नोकरी स्वीकारावी लागली. आता ते आपल्या घराजवळ नोकरी करत असून त्यांची स्थिती आता दिलासादायक आहे.

