

कोलकाता; वृत्तसंस्था : कोलकाता उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने बुधवारी एका महत्त्वपूर्ण निर्णयात नोकरीसाठी पैसे घोटाळाप्रकरणी 32,000 प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करणारा एकल खंडपीठाचा आदेश फिरवला आहे.
पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळाद्वारे 2014 च्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या माध्यमातून या शिक्षकांची भरती करण्यात आली होती. न्यायालयाने म्हटले की, सर्वच नियुक्त्यांमध्ये अनियमितता सिद्ध झालेली नाही. तसेच, नऊ वर्षांच्या सेवेनंतर नोकरी रद्द केल्यास शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांवर होणार्या गंभीर परिणामांचीही न्यायालयाने दखल घेतली. न्यायमूर्ती तपब्रत चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले की, सर्व भरती प्रक्रियेत अनियमितता सिद्ध न झाल्याने एकल खंडपीठाचा आदेश कायम ठेवण्यास आम्ही इच्छुक नाही.