

Donald Trump Nobel Greenland Controversy: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळला नसल्यानं ते फारच नाराज झाले होते. त्याची साक्ष देणारा पुरावा थेट नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गाहर स्टोरे यांना पाठवलेल्या पत्रात मिळाला आहे. हे पत्र आता बाहेर आले असून डोनाल्ड ट्रम्प हे जगात शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी आता माझी नाही. तसेच ग्रीनलँडवर कब्जा करण्याचे त्यांचे प्रयत्न हे शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला नसल्याच्या नाराजीशी जोडला गेलेला आहे. ही माहिती पब्लिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस (PBS) ने दिली आहे.
नॉर्वेच्या पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात नोबेल पुरस्कार मिळाले नसल्यामुळं जागतिक मुद्द्यांकडे लक्ष देण्याचा त्यांचा दृष्टीकोण बदलला असल्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. ते आपल्या पत्रात लिहितात की, 'आमच्या देशानं आठपेक्षा जास्त युद्ध थांबवल्यानंतरही, मला नोबेल पुरस्कार दिले गेला नाही. आता फक्त माझ्यावरच शांततेच्या बाबतीत विचार करण्याची कोणतीही जबाबदारी आहे असं वाटत नाही. असं असलं तरी मी शांततेचा कायम पुरस्करता राहणार आहे. मात्र आता मी अमेरिकेसाठी काय योग्य आहे याबाबत देखील विचार करू शकतो.'
ग्रीनलँड हे डेन्मार्कचे स्वायत्त क्षेत्र आहे. मात्र ट्रम्प यांनी पत्रात डेन्मार्कचा हा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. ट्रम्प यांनी डेन्मार्कच्या स्वायत्ततेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांनी रशिया आणि चीन पासून डेन्मार्क या बेटाचं संरक्षण करू शकत नाही असा दावा केला.
ट्रम्प लिहितात, 'डेन्मार्क त्या जमिनीचे रशिया किंवा चीनपासून संरक्षण करू शकत नाही. मग त्यांच्याकडे त्याचा मालकी हक्का का आहे? याबाबतचा कोणताही लिखीत दस्तऐवज नाहीये. एवढंच की शेकडो वर्षापूर्वी तिथं एक नाव पोहचली होती. मात्र आमची देखील नाव तिथं पोहचली होतीच.'
जरी डोनाल्ड ट्रम्प यांनी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला नाही म्हणून पत्र लिहून आपली निराशा आणि नाराजी नॉर्वेच्या पंतप्रधानांकडे व्यक्त केली असली तरी हा पुरस्कार नॉर्वेचे सरकार नाही तर एक स्वतंत्र समिती देते हे वास्तव ते विसरले. दरम्यान, लीक झालेल्या पत्रातील कंटेटला नॉर्वेच्या पंतप्रधानांनी दुजोरा दिला आहे.