US Vs Greenland Conflict: ग्रीनलँड ठरणार नवी रणभूमी... युरोपचं सैन्य दाखल, ट्रम्पशी करणार दोन हात?

डोनाल्ड ट्रम्प हे युरोपात घुसखोरी करून डेन्मार्कच्या अख्त्यारीत असलेल्या ग्रीनलँडवर कब्जा करू इच्छितात.
US Vs Greenland Conflict
US Vs Greenland Conflictpudhari photo
Published on
Updated on

US Vs Greenland Conflict Europe Troops: व्हेनेजुएलानंतर आता डोनाल्ड ट्रम्प प्रशानसाच्या रडारवर ग्रीनलँड आहे. कोणत्याही प्रकारे ग्रीनलँडवर नियंत्रण मिळवायचं आहे असा चंग डोनाल्ड ट्रम्प यांनी बांधला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाला युरोपीयन देशांनी विरोध केला असून आता युरोपने आपली छोटी सैन्य तुकडी ग्रीनलँडमध्ये पाठवली आहे. ग्रीनलँडला पाठिंबा दर्शवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

US Vs Greenland Conflict
Donald Trump Nobel: अखेर डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातात आला नोबेल पुरस्कार.... व्हाईट हाऊसमध्ये नेमकं काय घडलं?

ट्रम्प यांचा ग्रीनलँडवर डोळा

डोनाल्ड ट्रम्प हे युरोपात घुसखोरी करून डेन्मार्कच्या अख्त्यारीत असलेल्या ग्रीनलँडवर कब्जा करू इच्छितात. तशी इच्छा त्यांनी अनेकवेळा बोलून देखील दाखवली आहे. दरम्यान डेन्मार्कचे वरिष्ठ राजनैतिक नेत्यांनी बुधवारी वॉशिंग्टनमधील बैठकीत सामील झाले होते.

US Vs Greenland Conflict
Greenland Ice Melt History | 7,000 वर्षांपूर्वी ग्रीनलँडचा बर्फ पूर्णपणे वितळला होता!

युरोपीयन देशांचे सैन्य तैनात

डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या व्यक्तीनं दुसऱ्या देशावर चढाई केली त्याची बाजू घेतली. त्यांनी रशियाच्या व्लादीमीर पुतीन यांच्याऐवजी युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांना शांती वाटाघाटीत अडथळा आणल्याचा दोष दिला.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताज्या वक्तव्यामुळं युकोपीयन नेत्यांना मोठा झटका बसला आहे. त्यानंतर फ्रान्स, जर्मनी, युनायटेड किंगडम, नेदरलँड्स, फिनलँड, नॉर्वे आणि स्वीडन या देशाच्या छोट्या सैन्य तुकड्या आर्टिक आईसलँड ग्रीनलँडवर गुरूवारी दाखल झाल्या आहेत.

US Vs Greenland Conflict
Russia Ukraine War | रशिया-युक्रेन युद्ध थांबेल काय?

रोटेशन पॉलिसीने तैनाती

फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रोन यांनी फ्रान्स ग्रीनलँडला सर्वतोपरी मदत करणार असल्याचं सांगितलं. डॅनिश संरक्षण मंत्री ट्रोएल यांनी गुरूवारी सांगितलं की, ग्रीनलँडमध्ये कायमस्वरूपी लष्करी तळ निर्माण करण्यात डेन्मार्कचं मोठं योगदान असणार आहे. याचबरोबर त्यांनी अनेक नाटो देशातील सैनिक हे ग्रीनलँडमध्ये रोटेशन बेसिसवर येतील.

अमेरिका ताबा मिळवण्यावर ठाम

दरम्यान, व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरी केरोलिन लेव्हिट्ट यांनी सांगितलं की युरोपातील लष्करी तुकड्यांची उपस्थिती ही डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णय प्रक्रियेवर परिणाम करणार नाही. ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याच्या उद्येशावर देखील याचा काही परिणाम होणार नाही. तसेच त्यांनी डेन्मार्कसोबत तांत्रिक मुद्द्यावर चर्चा सुरूच राहील असं देखील सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news