Donald Trump Firy Interview: डार्लिंग आता बस झालं... सतत 'पुरावा' मागत महिला पत्रकारानं ट्रम्प यांना चांगलंच केलं हैराण; शेवटी...

Donald Trump Firy Interview
Donald Trump Firy Interviewpudhari
Published on
Updated on

Donald Trump Firy Interview: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यात डोनाल्ड ट्रम्प एका लाईव्ह मुलाखतीतून उठून जाताना दिसत आहे. ते मुलाखतकार महिला पत्रकारावर चांगलेच भडकेले दिसत आहेत. तर दुसरीकडे महिला पत्रकाराने देखील डोनाल्ड ट्रम्प यांना कात्रीत पकडत आपल्या प्रश्नावर ठाम असल्याचं दिसत आहे.

Donald Trump Firy Interview
Donald Trump Scold Netanyahu: वेडा झालाय का... मी नसतो तर जेलमध्ये असता.. डोनाल्ड ट्रम्प नेतन्याहूंवर एवढे का भडकले?

तुम्ही अप्रामाणिक आहात

डोनाल्ड ट्रम्प यांनी एनबीसी अँकर क्रिस्टिन वेल्कर यांना अप्रमाणिक, स्टुपीड म्हणत तो इंटरव्हू सोडला. अँकर क्रिस्टिन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅलिफोर्नियामध्ये संथ मतमोजणी सुरू असल्यावरून टीका केली होती. त्यावेळी त्यांनी या निवडणुकीत गोंधळ झाला असल्याचा दावा केला. यावर पत्रकार क्रिस्टिन यांनी पुरावे द्या तुम्ही पुरावे देत नाहीये असं म्हणत ट्रम्प यांना चांगलंच घेरलं.

डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅलिफोर्निया मतमोजणीवर आक्षेप नोंदवताच पत्रकार क्रिस्टिन यांनी कारण ते बॅलट पेपरची टॅली करत आहेत त्यामुळं उशीर होत आहे असं सांगितलं. त्यावेळी ट्रम्प यांनी तुम्हाला माहिती आहे का ते असं का करत आहेत? कारण ते निवडणुकीत घोटाळा करत आहेत.'

Donald Trump Firy Interview
Iran Targets Ivanka Trump: इराणच्या अल-सादीचे मोठं धाडस केलं... थेट ट्रम्प यांच्या मुलीच्या जीवाशी खेळ; कशाचा बदला घेणार होता?

पुरावा द्या

यानंतर पत्रकार क्रिस्टिन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे थेट पुरावा मागितला. त्यावर डोनाल्ड ट्रम्प चाचपडले आणि त्यांनी मी असं लोकांकडून ऐकलं आहे असं सांगितलं. त्यावर हा काही पुरावा नाही असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांना घेरलं. त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी मतदानानंतर पाच दिवस मतमोजणी चालणे हे योग्या आहे का असा प्रश्न विचारला. ते अजूनही विजेता निवडू शकलेले नाहीत असं सांगितलं.

यावर पत्रकाराने प्रक्रिया संथ आहे मात्र कॅलिफोर्नियाचे अधिकारी यावर काम करत आहेत असं सांगितलं. त्यावर कॅलिफोर्नियाचे निवडणूक अधिकारी हे अप्रमाणिक असून तुम्ही पत्रकार आणि तुमचे पत्रकार मित्र देखील अप्रामाणिक असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला.

Donald Trump Firy Interview
trump adios post meaning |डोनाल्‍ड ट्रम्प यांच्या नव्या 'ट्रुथ सोशल' पोस्टने खळबळ: स्पॅनिश शब्द 'Adios'चा अर्थ काय?

अमेरिकेची निवडणूक अप्रगत देशासारखी

ट्रम्प म्हणाले, ते तुमच्याप्रमाणेच अप्रमाणिक आहेत तुमचा मीडिया हा अप्रमाणिक आहे. मीट द प्रेस हे देखील अप्रामाणिक आहे. निवडणुकीच्या बाबतीत अमेरिका हा अप्रगत देशांसारखा आहे असं देखील ट्रम्प यांनी सांगितलं.

त्यावर पत्रकार क्रिस्टिन यांनी, मी अप्रामाणिक नाही. त्यावर ट्रम्प यांनी तुम्ही एकतर अप्रामाणिक आहात किंवा मूर्ख आहात. तुम्ही तुम्ही त्यांच्या हातातील बाहुलं आहात. तुम्हीला माहिती आहे की ही निवडणूक एक घोटाळा आहे. तुमच्या नेटवर्कला माहिती आहे की हा घोटाळा आहे.

Donald Trump Firy Interview
Donald Trump Threat : ‘इराणला पृथ्वीवरून नामशेष करू’, ट्रम्प यांची इराणला धमकी

डोनाल्ड ट्रम्प मुलाखतीतून गेले ऊठून

या दरम्यान, पत्रकार याचे सतत पुरावे मागत राहिली. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी पुरावे न देता मुलाखत अर्ध्यात सोडून जाणंच पसंत केलं. ते मुलाखत सोडून देताना म्हणाले, 'माफ करा, तुम्ही याला मी सोडून गेलो असं म्हणता मात्र आता बस झालं. आभारी आहे डार्लिंग. तुम्हाला दिवस चांगला जावो.' असं म्हणतं ट्रम्प यांनी माईक काढला आणि जमिनीवर फेकून दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news