Iran US conflict: ट्रम्प यांचा इशारा इराणने धुडकावला! कुवैतपासून बहरीनपर्यंत अमेरिकेच्या लष्करी तळांवर भीषण हल्ले

डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीचे उल्लंघन न करण्याचा इशारा दिल्यानंतर काही तासांतच, इराणने अमेरिकेच्या ८ प्रमुख लष्करी तळांवर भीषण मिसाइल आणि ड्रोन हल्ला केला आहे.
US Iran conflict
US Iran conflictfile photo
Published on
Updated on

Iran US conflict

तेहरान: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीचे उल्लंघन न करण्याचा इशारा दिल्यानंतर काही तासांतच, इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स'ने अमेरिकेच्या ८ प्रमुख लष्करी तळांवर भीषण मिसाइल आणि ड्रोन हल्ला केल्याचा दावा केला आहे. अमेरिकेच्या नव्या आक्रमकतेला हे आमचे 'निर्णायक चोख प्रत्युत्तर' असल्याचे इराणने म्हटले आहे.

मध्यरात्री एकत्र कारवाई; कुवैत, बहरीनमधील तळांना केले लक्ष्य

इराणच्या आयआरजीसी नुसार, हा थरारक हल्ला मध्यरात्री २ ते ३ च्या सुमारास करण्यात आला. यामध्ये इराणचे नौदल आणि हवाई दलाने संयुक्तपणे मोहीम फत्ते केली. अमेरिकेच्या ज्या ८ महत्त्वाच्या तळांना लक्ष्य करण्यात आले, त्यामध्ये कुवैतचा 'अली अल सलेम' एयरबेस आणि बहरीनमध्ये तैनात असलेल्या अमेरिकेच्या पाचव्या नौदलाच्या मुख्यालयाचा प्रामुख्याने समावेश आहे. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि आत्मघाती ड्रोनच्या साहाय्याने हे तळ उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा इराणने केला आहे.

US Iran conflict
US Iran conflict: पुन्हा बिनसलं? अमेरिका आणि इराणचे एकमेकांवर हल्ले; जगाची चिंता वाढली!

...म्हणून इराणने हल्ला केला

इराणने स्पष्ट केले की, शत्रू राष्ट्राने (अमेरिका) आधी इराणच्या सागरी हद्दीतील ५ किनारी चौक्यांवर हल्ला चढवला होता. संशयास्पद जहाज रोखण्याच्या बहाण्याने अमेरिकेने ही आगळीक केली होती, ज्याला प्रत्युत्तर म्हणून हा प्रतिहल्ला करण्यात आला. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिका आणि इराणमध्ये एक करार झाला होता, ज्यानुसार होर्मुजच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या जहाजांच्या वाहतुकीच्या सुरक्षेची जबाबदारी इराणकडे देण्यात आली आहे. यापुढे कोणत्याही जहाजाने नियम तोडल्यास अधिक कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही इराणने दिला आहे.

अमेरिकेचे इराणमधील काही तळांवर हल्ले

दुसरीकडे, अमेरिकेच्या मध्यवर्ती लष्करी कमांडने इराणमधील काही तळांवर हल्ले केल्याची कबुली दिली आहे. एका व्यावसायिक तेलवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. इराणच्या सरकारी वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, हॉर्मोझगान प्रांतातील 'सिरिक' भागात एका टेलिकॉम टॉवरवर हल्ला झाला असून तिथे प्रचंड स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. याशिवाय 'केशम' बेटावरही काही स्फोट झाल्याची माहिती आहे.

वादाची ठिणगी कशी पडली?

हा ताजा वाद शुक्रवारी सुरू झाला, जेव्हा इराणी नौदलाने होर्मुजमधून जाणाऱ्या एका जहाजाला इशारा देण्यासाठी गोळीबार केला होता. यानंतर अमेरिकेने इराणवर हल्ला केला आणि प्रत्युत्तरादाखल इराणने थेट अमेरिकेच्याच तळांना लक्ष्य केले. ट्रम्प यांनी स्वतः घोषित केलेल्या युद्धबंदीचे अमेरिकेने अनेकदा उल्लंघन केले असून, या उल्लंघनांना उत्तर म्हणून आतापर्यंत १०० हून अधिक वेळा प्रत्युत्तर देण्यात आल्याचे इराणने म्हटले आहे.

US Iran conflict
US-Iran Israel War|इस्रायल नष्ट होईपर्यंत मध्य पूर्वेत शांतता नांदणार नाही : इराणने युद्धाच्या आगीत ओतले तेल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news