नेपाळमध्ये सत्ता बदलामागचं कारण ठरलेलं Discord अ‍ॅप काय आहे?

Discord Gen Z Nepal protest : नेपाळमध्ये Gen-Z ने आंदोलनासाठी ‘Discord’ अॅपला गुप्त शस्त्र बनवले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी असतानाही लाखो तरूणांनी अ‍ॅपचा वापर करून सरकार बदलून दाखवले. जाणून घ्या नेमकं काय आहे हे अ‍ॅप?
Discord Gen Z Nepal protest
Discord Gen Z Nepal protestfile photo
Published on
Updated on

Discord Gen Z Nepal protest

नवी दिल्ली: शेजारील देश नेपाळमध्ये Gen-Z ने आक्रमक आंदोलन करून सत्ता कशी उलथवून लावली, याची जगभरात चर्चा आहे. भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि राजकीय अस्थिरतेमुळे त्रस्त तरुण रस्त्यावर उतरले आणि पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला.

सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली असतानाही त्यांचा आवाज एक कसा झाला? असा प्रश्न सर्वांना पडला असेल. त्याचे उत्तर आहे डिस्कॉर्ड (Discord) नावाचे अ‍ॅप, ज्याला Gen-Z ने आपले आंदोलनाचं गुप्त शस्त्र बनवलं. केवळ नेपाळमध्येच नाही, तर भारतातही डिस्कॉर्ड हा Gen-Z चा नवीन अड्डा बनत आहे. जाणून घ्या त्याचे फायदे, तोटे आणि वापरण्याची पद्धत.

Discord Gen Z Nepal protest
Nepal: नेपाळ भारताचा भाग होणार होता! ७५ वर्षांपूर्वीची 'ती' गोष्ट माहित आहे का?

नेपाळच्या माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांची शुक्रवारी अंतरिम पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. विशेष गोष्ट अशी आहे की, डिस्कॉर्डवर झालेल्या चर्चा आणि पोल्सच्या माध्यमातूनच सुशीला कार्की हे सर्वात पसंतीचे नाव असल्याचे निश्चित झाले. ओलींच्या राजीनाम्यानंतर 'युथ अगेन्स्ट करप्शन' (Youth Against Corruption) नावाच्या डिस्कॉर्ड सर्व्हरवर त्याचे सदस्य एकत्र आले आणि त्यांनी नेपाळच्या पुढील नेत्याची निवड प्रक्रिया सुरू केली. या सर्वरवर १.३० लाखाहून अधिक सदस्य जोडले गेले आहेत. या वापरकर्त्यांच्या ठिकाणांची माहिती मिळत नसल्यामुळे, नव्या पंतप्रधानांच्या निवडीसाठी झालेल्या पोलमध्ये नेपाळबाहेरील लोकही सहभागी झाले असण्याची शक्यता आहे. सुशीला कार्की यांची नवीन नेता म्हणून निवड करण्यात आली. Discord ची खरी ताकद म्हणजे या अॅपवर एकाच वेळी लाखो लोक एकत्र येऊ शकतात.

डिसकॉर्ड म्हणजे काय?

डिसकॉर्ड हे एक मोफत व्हॉइस, व्हिडिओ आणि टेक्स्ट चॅटिंग ॲप आहे. आज भलेही जन-झेडमध्ये हे ॲप गप्पा मारण्यासाठी, ग्रुप्स बनवण्यासाठी, पोल घेण्यासाठी आणि सल्ला घेण्यासाठी लोकप्रिय झालं असलं, तरी याची सुरुवात गेमर्सना लक्षात घेऊन करण्यात आली होती. अमेरिकेचे जेसन सिट्रोन आणि स्टानिस्लाव विश्नेव्स्की हे या ॲपचे सह-संस्थापक आहेत. त्यांचा उद्देश अशी चॅट सेवा तयार करणं होतं, ज्याचा वापर गेमर्स गेम खेळताना करू शकतील आणि गेममध्ये कोणताही अडथळा येणार नाही. मे २०१५ मध्ये डिसकॉर्ड लाँच झालं आणि लवकरच ते लोकप्रिय झालं. आता याचे कोट्यवधी युजर्स आहेत. आज या ॲपचा वापर स्टडी ग्रुप्स, ऑफिस टीम्स, स्टार्टअप्स, आर्टिस्ट कम्युनिटीज, म्युझिक फॅन ग्रुप्स आणि मित्रांशी गप्पा मारण्यासाठीही केला जातो.

Discord Gen Z Nepal protest
Nepal Protest | ‘जेन झेड’चा फटका, भ्रष्टाचार्‍यांना झटका!

Gen-Z मध्ये इतका लोकप्रिय का?

डिसकॉर्ड Gen-Z मध्ये इतकं लोकप्रिय असण्याचं कारण म्हणजे ते इतर प्लॅटफॉर्मपेक्षा अधिक सोयीस्कर आणि आरामदायी आहे. WhatsApp पेक्षा यात जास्त फीचर्स आहेत. एका सर्व्हरवर लाखो यूजर्स जोडता येतात. वेगवेगळ्या रोल्स दिले जाऊ शकतात. हजारो लोक एकत्र व्हॉईस चॅट करू शकतात, ५० जणांना स्क्रीन शेअर करता येते.

इतर प्लॅटफॉर्मपेक्षा वेगळं काय?

  • आज फेसबुक, व्हॉट्सॲप, टेलिग्राम यांसारखी ॲप्स प्रचलित असली, तरी डिसकॉर्ड काही बाबतीत या ॲप्सपेक्षा जास्त फीचर्स आणि सुविधा देतं.

  • व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामसारखी ॲप्स फक्त ग्रुप चॅट आणि चॅनेल्सपुरती मर्यादित आहेत. पण डिसकॉर्डमध्ये आपण सर्व्हर आणि चॅनेल्स बनवू शकतो, जिथे वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, व्होटिंग, पोल आणि व्हॉइस-व्हिडिओ गप्पा होऊ शकतात. सोप्या भाषेत सांगायचं तर हे फक्त एक चॅट ॲप नसून एक डिजिटल कम्युनिटी प्लॅटफॉर्म आहे.

  • डिसकॉर्डवर एकाच सर्व्हरमध्ये लाखो युजर्स सामील होऊ शकतात, तर व्हॉट्सॲपच्या एका ग्रुपमध्ये फक्त १०२४ सदस्य जोडता येतात. यामुळेच तरुण आंदोलनं, ऑनलाइन स्टडी ग्रुप्स आणि मोठ्या डिजिटल कम्युनिटीजसाठी डिसकॉर्ड अधिक लोकप्रिय प्लॅटफॉर्म बनलं आहे.

  • डिसकॉर्डमध्ये सर्व्हरचे ॲडमिन वेगवेगळ्या सदस्यांना खास रोल देऊ शकतात, जसे की मॉडरेटर, मेंबर, गेस्ट. याशिवाय प्रत्येक रोलसाठी वेगवेगळे अधिकार ठरवले जातात. उदाहरणार्थ, कोण मेसेज पाठवू शकतो, कोण व्हॉइस-व्हिडिओ चॅनेलमध्ये सामील होऊ शकतो, कोण इतर सदस्यांना बॅन किंवा किक करू शकतो. व्हॉट्सॲपमध्ये ग्रुप ॲडमिनकडे फक्त काही मूलभूत अधिकार असतात, जसे की सदस्य जोडणे किंवा काढणे.

  • हजारो लोक डिसकॉर्डमध्ये एकाच वेळी व्हॉइस चॅट करू शकतात, तर व्हॉट्सॲपमध्ये ही संख्या केवळ ३२ आहे. यासोबतच, एखादी व्यक्ती सुमारे ५० लोकांशी एकाच वेळी स्क्रीन शेअर करू शकते.

  • डिसकॉर्डवर बॉट्सच्या मदतीने ऑटोमेशन, पोल, गेम्स आणि मॉडरेशन करता येतं. प्रोफाईल, ॲनिमेटेड इमोजी आणि सर्व्हर बूस्टसारख्या सुविधांमुळे ते अधिक आकर्षक बनतं.

इंटरफेस आहे खूप सोप

डिसकॉर्ड वापरणं खूप सोपं आहे. समोरच्या स्क्रीनवर Add Friends चा पर्याय दिसेल. त्यावर टॅप केल्यास तुम्ही एसएमएस, ईमेल, व्हॉट्सॲप, टेलिग्राम किंवा लिंक कॉपी करून मित्रांना इन्व्हाईट करू शकता. तुमच्याकडे मित्राचं युजरनेम असल्यास तुम्ही थेट त्याला जोडू शकता. मुख्य स्क्रीनवर, डाव्या बाजूला सर्वात वर मेसेजचं आयकॉन असेल. तिथे तुमच्या मित्रांची लिस्ट आणि त्यांच्यासोबत झालेली चॅट दिसेल.

एंड-टू-एंड एन्क्रिप्शन नाही

डिसकॉर्डमध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन (End-to-End Encryption) नाही. सोप्या शब्दांत सांगायचं तर, यात युजर्सना प्रायव्हसी मिळत नाही. व्हॉट्सॲपसारख्या प्लॅटफॉर्मवर एंड-टू-एंड एन्क्रिप्शन असतं, म्हणजे मेसेज फक्त पाठवणाऱ्याला आणि घेणाऱ्यालाच दिसतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news