Nepal: नेपाळ भारताचा भाग होणार होता! ७५ वर्षांपूर्वीची 'ती' गोष्ट माहित आहे का?

मोहन कारंडे

आज नेपाळ एक स्वतंत्र देश आहे, पण ७५ वर्षांपूर्वी तो भारताचा भाग बनू शकला असता.

१९५१ मध्ये नेपाळचे राजा त्रिभुवन बीर बिक्रम शाह यांनी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला होता.

जागतिक परिस्थिती लक्षात घेता नेपाळचे भारतात विलीनीकरण व्हावे अशी नेपाळच्या राजाची इच्छा होती.

पण, नेहरूंनी राजाचा प्रस्ताव नम्रपणे नाकारला. नेहरूंना वाटले की नेपाळ एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून राहावे.

भारताचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणब मुखर्जी यांनी 'द प्रेसिडेंशियल इयर्स' या आपल्या आत्मचरित्रात या घटनेचा उल्लेख केला आहे.

प्रणब मुखर्जी लिहितात की, जर नेहरूंच्या जागी इंदिरा गांधी असत्या तर त्यांनी ही संधी सोडली नसती.

जसे इंदिरा गांधींनी दूरदृष्टीने सिक्कीमचे भारतात विलीनीकरण केले, त्याचप्रमाणे त्यांनी नेपाळच्या प्रस्तावाचाही स्वीकार केला असता, असे त्यांचे मत आहे.

आज नेपाळ राजकीय अस्थिरतेचा सामना करत आहे. गेल्या काही वर्षांपासून नेपाळमध्ये राजकीय आणि सामाजिक शांतता प्रस्थापित होऊ शकलेली नाही.

गेल्या १७ वर्षांत येथे १४ वेळा पंतप्रधान बदलले. ९ सप्टेंबर रोजी पंतप्रधान ओली यांचा राजीनामा हे जनता आणि नेत्यांमधील तुटलेल्या विश्वासाचे ताजे उदाहरण आहे.