Gangster Uzair Baloch brother shot: खऱ्या 'धुरंधर'च्या भावावर भररस्त्यात गोळीबार; कराचीत पुन्हा गँगवॉरचा भडका?

कराचीतील लियारी भागात पाकिस्तानमधील तुरुंगात असलेला कुख्यात गँगस्टर उझैर बलोचचा भाऊ झुबैर बलोच याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला.
Gangster Uzair Baloch
Gangster Uzair Balochfile photo
Published on
Updated on

Dhurandhar Gangster Uzair Baloch brother shot

कराची: कराचीतील लियारी भागात पाकिस्तानमधील तुरुंगात असलेला कुख्यात गँगस्टर उझैर बलोचचा भाऊ झुबैर बलोच याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात झुबैर गंभीर जखमी झाला असून दोन नागरिकांनाही गोळ्या लागल्या आहेत. उझैर बलोचच्या निर्दयी वर्चस्ववाढीवर 'धुरंधर' हा चित्रपट आधारित आहे.

पाकिस्तानातील कराची शहरातील लियारी परिसरात गुरुवारी सायंकाळी ही थरारक घटना घडली. तुरुंगात असलेला कुख्यात गँगस्टर आणि बंद पडलेल्या पीपल्स अमन कमिटीचा माजी प्रमुख उझैर बलोच याचा भाऊ झुबैर बलोच याच्यावर मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला.

Gangster Uzair Baloch
Spain migrant crisis | स्पेनच्या सीमेवर ३४ जणांचा मृत्यू; ६० हजार नागरिकांची घुसखोरी

४० वर्षीय झुबैर बलोच मुख्य चकिवारा रोडवरील आपल्या घराबाहेर बसला असताना हल्लेखोरांनी त्याला लक्ष्य केले. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या हल्ल्यात रस्त्यावरून जाणारे आणखी दोन नागरिकही जखमी झाले.

जखमी झुबैर बलोच आणि अन्य दोघांना तातडीने कराचीतील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. झुबैरच्या छाती आणि पोटात अनेक गोळ्या लागल्याने त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

झुबैर बलोच कोण आहे?

झुबैर बलोच याला २०१२ मध्ये सात गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर जानेवारी २०२५ मध्ये त्याची सुटका झाली होती. काही महिन्यांपूर्वी त्याने एका राजकीय पक्षात प्रवेश केला होता आणि आपल्या परिसरात त्या पक्षाचे झेंडेही लावले होते, अशी माहिती स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली.

लियारीत पुन्हा गँगवॉरची भीती

स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, कराचीतील कारवाईनंतर दुबई आणि इराणमध्ये पळून गेलेले काही गँगस्टर अमेरिका-इराण संघर्षानंतर पुन्हा लियारीत परतल्याच्या अफवा पसरल्या आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा रक्तरंजित गँगवॉर सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे.

उझैर बलोचचा 'धुरंधर'शी संबंध

उझैर बलोच हा पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टर मानला जातो. त्याच्या आयुष्यावरून प्रेरित एक महत्त्वाचे पात्र अभिनेता डॅनिश पंडोरने २०२५ मधील बॉलिवूड चित्रपट 'धुरंधर'मध्ये साकारले होते. याच चित्रपटाच्या दुसऱ्या भागातही हे पात्र दाखवण्यात आले होते.

उझैर बलोच अद्याप तुरुंगात

याच वर्षी मार्च महिन्यात दहशतवादविरोधी न्यायालयाने उझैर बलोचच्या खून, पोलीस चकमकी आणि स्फोटके बाळगण्याशी संबंधित सात प्रकरणांतील जामीन अर्ज फेटाळले होते. यापूर्वी एप्रिल २०२० मध्ये लष्करी न्यायालयाने त्याला हेरगिरीच्या आरोपात दोषी ठरवत १२ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. २०१२ मध्ये कायदा अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांवर बंदुका आणि स्फोटकांच्या साहाय्याने हल्ला केल्याचा आरोपही उझैर बलोचवर आहे.

Gangster Uzair Baloch
PoK Election Violence : पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणुकीदरम्यान हिंसाचाराचा भडका; चकमकीत ३० नागरिकांचा मृत्यू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news