Crude Oil Prices Rise : हॉर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याबाबत अनिश्चितता; जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ

हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली होण्याची आशा; गेल्या आठवड्यात झाली होती घसरण
crude oil prices
crude oil prices प्रातिनिधिक छायाचित्र.
Published on
Updated on

Crude Oil Prices Rise : हॉर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) खुली होण्‍याबाबतची अनिश्चितता कायम राहिल्‍याने आज (दि. १०) जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली. ओमानसोबतच्या नवीन सागरी वाहतूक कराराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे इराणने म्हटले असले, तरी अमेरिकेने त्यांच्या इतर अटी पूर्ण करणे आवश्यक असल्याचा पुनरुच्चार केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात 'ब्रेंट क्रूड'चे दर १.०९ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ८४.४६ डॉलरवर पोहोचले, तर अमेरिकन 'वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट' (WTI) क्रूडचे फ्युचर्स दर ६१ सेंट्स म्हणजेच ०.७८ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ७८.७९ डॉलरवर गेले आहेत.

गेल्या आठवड्यात झाली होती तेल दरात घसरण

युद्ध सुरू होण्यापूर्वी जगातील एकूण तेलाच्या एक पंचमांश वाहतूक याच मार्गाने होत असे. इराण आणि ओमानदरम्यान लवकरच करार होऊन हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली होईल, या आशेने गेल्या आठवड्यात दोन्ही बेंचमार्क दरांमध्ये ७ टक्क्यांहून अधिक घसरण झाली होती.

crude oil prices
India vs Bangladesh cricket : 'आम्ही स्वतः निर्णय घेऊ शकत नाही': बांगलादेश दौऱ्यासाठी BCCI केंद्राकडे मागणार परवानगी!

इराणने केला नुकसानभरपाईचा पुनरुच्चार

ओमानसोबतचा करार अंतिम टप्प्यात असला तरी, वॉशिंग्टनने त्यांच्या इतर अटी पूर्ण केल्यावरच हा सागरी मार्ग खुला केला जाईल, असा इशारा इराणने रविवारी दिला. अमेरिकेने केलेल्या व्यापक हल्ल्यांची नुकसानभरपाई इराणला द्यावी, ही यात मुख्य अट आहे. अमेरिकेने जूनमध्ये झालेल्या अंतरिम कराराचे उल्लंघन केले आहे; त्यामुळे अमेरिका आणि इराणमध्ये कोणतीही चर्चा सुरू नाही आणि जोपर्यंत अमेरिका हा करार पाळत नाही, तोपर्यंत तेहरान कोणतीही चर्चा करणार नाही, असे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी रविवारी स्पष्ट केले आहे.

crude oil prices
Jharkhand Student Protest : झारखंड सरकारने CGL परीक्षा रद्दची मागणी फेटाळली : विद्यार्थ्यांचा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

पुरवठा साखळीला नवा धोका

दुसरीकडे, तेलाच्या पुरवठ्यावर आणखी एक मोठे संकट ओढवले आहे. गेल्या वीकेंडला सौदी अरेबियातील तेल प्रकल्पावर हल्ला झाला. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे प्रादेशिक अस्थिरता वाढली असून, त्याला प्रत्युत्तर म्हणून सौदीने तुर्किये आणि पाकिस्तान या सुन्नी मुस्लिम मित्र राष्ट्रांसोबत संरक्षण करार केला. या कराराच्या दोनच दिवसांत, म्हणजेच रविवारी, इराणसमर्थित हूती बंडखोरांनी 'सौदी अरामको'च्या जझान रिफायनरीला लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. याशिवाय, संयुक्त अरब अमिरातीच्या 'अडनोक' कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, संघर्ष सुरू झाल्यापासून हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या त्यांच्या १५ जहाजांवर आतापर्यंत हल्ले झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news