Chinese Glass: फ्रान्सच्या आंदोलकांनी लाथा मारल्या, विटा फेकल्या, लोखंडी रॉडने वार केले तरी काच तुटली नाही; चीनच्या कंपनीची जगभर चर्चा

Chinese Bulletproof Glass: फ्रान्समधील आंदोलनादरम्यान आंदोलकांनी विटा, लोखंडी पाइप आणि खुर्चीने दुकानाची काच फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, काच फुटली नाही.
Chinese Glass Company Goes Viral
Chinese Glass Company Goes Viral Pudhari
Published on: 
Updated on: 

Chinese Bulletproof Glass: जाहिरातीसाठी कंपन्या लाखो रुपये खर्च करतात. मात्र, चीनमधील एका काच उत्पादक कंपनीला कोणताही जाहिरात खर्च न करता जगभरात प्रसिद्धी मिळाली आहे. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी एका दुकानाची काच फोडण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र, अनेक प्रयत्न करूनही ही काच फुटली नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामुळे या काचेच्या मजबुतीची जगभर चर्चा होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये काही आंदोलक चेहऱ्याला मास्क लावून दुकानाच्या काचेवर लाथा मारताना दिसत आहेत. एवढेच नाही, तर त्यांनी काच फोडण्यासाठी विटा, लोखंडी पाइप आणि खुर्चीचाही वापर केला. मात्र, वारंवार मारुनही काच जागेवरून हलली नाही किंवा फुटली नाही. काचेच्या पृष्ठभागावर काही तडे गेले असले, तरी ती तुटली नाही. त्यामुळे ही काच नेमकी कोणत्या कंपनीची आहे, याबाबत उत्सुकता निर्माण झाली.

डेली मेलसह काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ही काच चीनमधील 'Hengxinfeng Special-Glass Co. Ltd.' या कंपनीची असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीनेही या व्हायरल व्हिडीओचा वापर आपल्या उत्पादनांचा टिकाऊपणा दाखवण्यासाठी केला आहे. एका आंदोलनातील घटनेमुळे कंपनीला अनपेक्षित प्रसिद्धी मिळाली आहे.

काय आहे या चिनी कंपनीचे वैशिष्ट्य?

चीनमधील हेनान प्रांतात असलेली Hengxinfeng कंपनी ही काचेचे संशोधन, उत्पादन आणि विक्री करते. कंपनीकडून स्फोटातही टिकू शकणारी काच, हातोड्याचे वार सहन करणारी मजबूत काच आणि गोळ्या रोखू शकणारी बुलेटप्रूफ काच तयार केली जाते.

कंपनीच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, त्यांच्या काचेचा वापर बँका, लष्कर, दागिन्यांची दुकाने आणि संग्रहालयांसारख्या सुरक्षेची अधिक गरज असलेल्या ठिकाणी केला जातो. कंपनीला चीन सरकारकडून उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यताप्राप्त उद्योगाचा दर्जाही मिळाला आहे. तसेच ती चायना सिक्युरिटी अँड सेफगार्ड असोसिएशनची सदस्य असल्याचेही कंपनीने सांगितले आहे.

Chinese Glass Company Goes Viral
Mirzapur The Movie OTT Release: थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर 'मिर्झापूर' आता OTT वर! पण यावेळी चाहत्यांना काय खास पाहायला मिळणार?

फ्रान्समध्ये आंदोलनाला हिंसक वळण

दरम्यान, फ्रान्समध्ये गेल्या महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. सुरुवातीला पॅरिसच्या उत्तरेकडील उपनगरांमध्ये शिक्षकांची कमतरता आणि शाळांमधील अपुऱ्या सुविधांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते. मात्र, हळूहळू या आंदोलनाचे स्वरूप बदलले.

Chinese Glass Company Goes Viral
Aamne Saamne Marathi Natak: 'आमने-सामने' नाटकात मोठा बदल! रोहन-केतकीच्या जागी दोन नव्या कलाकारांची एन्ट्री; कोण आहेत नवे चेहरे?

महागाई, वाढता जीवनावश्यक खर्च, सरकारी खर्चात होणारी कपात आणि घसरत चाललेले राहणीमान या मुद्द्यांवरून नागरिकांमध्ये नाराजी वाढली. त्यातून आंदोलन अधिक व्यापक झाले. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळणही लागले. अशातच आंदोलकांना फोडता न आलेल्या काचेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एका चिनी कंपनीला मात्र प्रसिद्धी मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.