iPhone Viral Video: बॉसने कर्मचाऱ्यांना गिफ्ट दिला iPhone; मात्र काहींच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला; मालक आले अन् त्यांनी...

गिफ्ट बॉक्स उघडल्यानंतर काहींच्या ओठावर हास्य असलं तरी चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. मात्र बॉस रूममध्ये आल्या आणि समान न्याय केला.
iPhone Viral Video
iPhone Viral Videopudhari
Published on: 
Updated on: 

iPhone Viral Video: तुमचा बॉस जर संपूर्ण ऑफिसमध्ये आयफोन वाटत सुटला तर तुम्हाला काय वाटले.... नक्कीच तुमचा आनंद पोटातच काय गगनात देखील मावणार नाही. विशेष म्हणजे जर मिटिंगसाठी बोलवून बॉसने तुम्हाला हे गोड सरप्राईज दिलं तर तुमचा चेहरा नक्कीच खुलणार.

iPhone Viral Video
iPhone 18 Pro Theft: आधी महिलेला विचारलं हा 18 Pro च आहे का... मग हिसकावून पळ काढला; नवा कोरा iPhone तिसऱ्या दिवशी गायब

काहींना iPhone तर काहींना...

असाच प्रसंग युएईमधील एका कंपनीत घडला आहे. बॉसने आधी संपूर्ण टीमला मिटिंग रूममध्ये बोलावलं. मिटिंग म्हटल्यावर सर्व कर्मचारी एक वेगळेच दडपण घेऊन मिटिंग रूममध्ये दाखल झाले. मात्र तिथं पोहचल्यावर एका एकाला बोलवून गिफ्टचे बॉक्स उघडायला लावले. त्यात iPhone चे सरप्राईज पाहून त्यांचा स्टाफ आनंदी झाला. मात्र हा आनंद प्रत्येकाचा नशिबात अन् बॉक्समध्ये नव्हता. काहींना फक्त मोठा कॅडबरीवर समाधान मानावं लागलं होतं.

युएईच्या कंपनीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मॅनेजमेंटमधील कर्मचारी त्यांच्यासमोर ठेवलेलं गिफ्ट पॅक एक एक करून उघडत होते. काहींच्या बॉक्समधून आयफोन बाहेर आला तर काहींना चॉकलेट मिळालं. कंपनीच्या या सरप्राईजची चर्चा मात्र सोशल मीडियावर सुरू आहे.

iPhone Viral Video
Apple iPhone 18 Pro Max: उकळत्या चहामध्ये ३ मिनिटं ठेवला iPhone 18 Pro Max; थर्मल प्रोटेक्शनच्या दाव्याचं काय झालं?

अखेर बॉसने केला समान न्याय

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ एका मॅनपॉवर कंपनी वर्ल्ड स्टार मॅनपॉवर कंपनीचे संस्थापक निषाद हुसैन आणि त्यांची पत्नी हसिना निषाद यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओत एका टेबलवर अनेक गिफ्ट बॉक्स ठेवलेले असातत. ते बॉक्स एक एक करून कर्मचारी उचलत होते. काहींना आयफोन मिळाला तर काहींना चॉकटले. त्यानंतर हसीन निषाद आत येतात आणि ज्यांना चॉकलेट मिळाले होते त्यांना देखील आयफोन देतात. एक प्रकारे ते कर्मचाऱ्यांसोबत प्रँकच करतात.

iPhone Viral Video
iPhone 18 ची प्रचंड क्रेझ! खरेदीसाठी दिल्ली, मुंबई, बेंगळूरमध्ये रात्रीपासूनच ॲपल स्टोअरबाहेर रांगा

बॉस काय म्हणाले?

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये हसीना निषाद लिहितात, 'मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून माझी धारणा आहे की खरे यश हे आपल्या लोकांच्या समर्पण, सकारात्मक वृत्ती, सामुहिक ताकद यांच्यातून येतं. प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक विचार आणि प्रत्येक योगदान आपल्याला पुढे जाण्यासाठी महत्वाची भूमिका निभावत असते.'

निषाद पुढे म्हणतात, 'मी तुम्हा सर्वांना तुमच्या क्षमतेवर विश्वास करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी, प्रत्येक संधी साधून एकमेकांचे समर्थन करून पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करते. चला आपल्या क्षमता अजून वाढवूया आत्मविश्वासाने आव्हानांचा सामना करूयात मिळून मोठी झेप घेऊयात. आमची ताकद आमचे लोक असून आमच्यासाठी आकाश ठेंगणं आहे.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news