

Apple iPhone 18 Pro Max: अॅप्पल आयफोन 18 Pro Max च्या चाचण्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओत आयफोनने केलेल्या दावांची पडताळणी करण्यात येत आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात एका व्यक्तीने सोशल मीडियावर नवा Apple iPhone 18 Pro Max उकळत्या चहात टाकला अन् तब्बल ३ मिनिटे ठेवला. त्याला आयफोन १८ प्रो मॅक्सचे हीट रेजिस्टन्स चेक करायचा होता.
Apple ने ८ सप्टेंबर रोजी नवीन आयफोन १८ प्रो ची सीरीज लाँच केली होती. यात दोन हँडसेट लाँच झाले. एका म्हणजे आयफोन १८ प्रो आणि दुसरा म्हणजे आयफोन १८ प्रो मॅक्स असे दोन व्हर्जन लाँच झाले आहेत. याची विक्री गेल्या आठवड्यात सुरू झाली आहे. त्यानंतर आता हा फोन कसा आहे याची पडताळणी सुरू झाली आहे.
सोशल मीडियावर आयफोन १८ प्रो मॅक्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दोन व्यक्ती आयफोन टेस्टिंग करत आहेत. ते रस्त्याच्या कडेवर असलेल्या एका चहा टपरीवर गेले. त्यानंतर त्यांनी महागडा आयफोन १८ प्रो मॅक्स उकळत्या चहामध्ये टाकला.
हा आयफोन उकळत्या चहात टाकल्यानंतर संबधित व्यक्तीने चला आयफोनचे थर्मल प्रोटेक्शन किती चांगलं आहे हे तपासून पाहूयात असे म्हणाला. त्यानंतर त्यांनी याचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरूवात केली.
आयफोन १८ प्रो मॅक्स उकळत्या चहाच्या पातेल्यात टाकल्यानंतर चहा पूर्ण ३ मिनिटांपर्यंत उकळू दिला. त्यानंतर आयफोनला बाहेर काढण्यात आलं. व्हिडिओत सांगण्यात आलं की मॉईश्चर आलं आहे.
आयफोन १८ प्रो मॅक्सला चहाच्या भांड्यातून बाहेर काढल्यानतंर त्याला साध्या पाण्याने स्वच्छ करण्यात आलं. त्यानंतर तो चालू आहे का हे पाहण्यात आलं. व्हिडिओत दाखवण्यात आल्याप्रमाणे आयफोनच्या कॅमेरा ऑन करण्यात आला. त्यानंतर फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. व्हिडिओत कॅमेरा लेन्समध्ये मॉईश्चर गेल्याचे सांगण्यात आलं.