Sunita Williams|बोईंग स्टारलायनरचा अंतराळातील मुक्काम वाढणार

NASA कडून मोहिमेचा कालावधी ९० दिवसांपर्यंत वाढवण्याचे प्रयत्न
Sunita Williams still in space due to technical glitch
तांत्रिक बिघाडामुळे अद्याप सुनीता विल्यम्स अवकाशातचFile Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्ससह त्यांच्या सहकार्याला अंतराळात घेऊन जाणारे बोईंग स्टारलायनर अंतराळयान अनेक महिने अंतराळात राहू शकते. त्यामुळे अमेरिकन अंतराळ संस्था नासा या मिशनचा विस्तार करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

मोहिमेचा कालावधी ४५ दिवसांवरून ९० दिवसांपर्यंत वाढवणार- NASA ची माहिती

नासाचे कमर्शियल क्रू प्रोग्राम मॅनेजर स्टीव्ह स्टिच यांनी सांगितले की, यूएस स्पेस एजन्सी स्टारलाइनरच्या मोहिमेचा कालावधी ४५ दिवसांवरून ९० दिवसांपर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे, असा सीएनएनच्या हवाल्याने सांगितल्याचे एएनआयने वृत्तात म्हटलेआहे.

Sunita Williams still in space due to technical glitch
तांत्रिक बिघाडामुळे अद्याप सुनीता विल्यम्स अवकाशातच

नासाकडून मोहिमेसाठी १ आठवड्याच्या कालावधीची आखणी

नासाने बोईंगच्या स्टारलायनर स्पेसक्राफ्टच्या पहिल्या क्रू चाचणीसाठी केवळ १ आठवड्याची योजना आखली होती. परंतु, मिशनमध्ये अडथळे निर्माण झाल्याने बोईंग स्टारलायनर अंतराळयानाला परतीच्या प्रवास लाबण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स आणि अन्य अंतराळवीरांना घेऊन गेलेले स्टारलायनर मिशनचा कालावधी ४५ दिवसांवरून ९० दिवसांपर्यंत वाढवण्याचा विचार नासा करत आहे, असे देखील वृत्तात म्हटले आहे.

Sunita Williams still in space due to technical glitch
Sunita Williams | मोहीम फत्ते; तिसऱ्या प्रयत्नात भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांनी इतिहास घडवला

स्टारलायनरची अंतराळयानाची इंधनक्षमता केवळ ४५ दिवसांची

बोईंगच्या स्टारलायनर प्रोग्राम मॅनेजर मार्क नप्पी यांच्या माहितीनुसार स्पेसक्राफ्टमधील हेलियम प्रणाली ज्या पद्धतीने तयार करण्यात आली होती ती अपेक्षितरित्या काम करत नाही. परिणामी सध्याच्या घडीला विल्यम्स आणि त्यांच्यासमवेत असणार्‍या अंतराळयात्रींना सुखरूप पृथ्वीवर परत आणण्यासाठीच नासाचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, उपलब्ध माहितीनुसार स्टारलायनरची इंधनक्षमता ४५ दिवसांची आहे. ही क्षमता वाढवण्याचे प्रयत्न सध्या नासाकडून सुरू आहेत.

Sunita Williams still in space due to technical glitch
Sunita Williams | सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातील मुक्काम वाढणार

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news