Sunita Williams | सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातील मुक्काम वाढणार

Astronaut Sunita Williams
Astronaut Sunita Williams
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांचा अंतराळातील मुक्काम वाढला आहे. हे दोघेही मंगळवार १८ जूनपर्यंत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) राहणार असल्याचे वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे.
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर (ISS) एक स्पेस बग आढळला आहे. त्यामुळे सुनीता विल्यम्स अंतराळवीरांना समस्या (Sunita Williams) निर्माण होऊ शकते. या कारणाने अंतराळयानाचा मुक्काम वाढवण्यात आला आहे.

अंतराळात 'या' जीवाणूची निर्मिती

अंतराळात शास्त्रज्ञांना 'एंटेरोबॅक्टर बुगांडेन्सिस' नावाचा बहु-औषध प्रतिरोधक जीवाणू सापडला आहे. जो इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरच्या (ISS) बंद वातावरणात विकसित झाला आहे. ताे अधिक शक्तिशाली बनला आहे. हे बहु-औषध प्रतिरोधक असल्याने त्याला अनेकदा 'सुपरबग' म्हणतात. हा जीवाणू श्वसन प्रणालीला संक्रमित करतो, त्यामुळे बोईंग कंपनीच्या स्टारलाइनर अंतराळयानाचा अंतराळातील मुक्काम वाढला (Sunita Williams) आहे.

6 जून रोजी बोईंग स्टारलाइनर अंतराळात पोहचले

सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बॅरी यूजीन बुच विल्मोर 6 जून 2024 रोजी नवीन बोईंग स्टारलाइनर अंतराळ यानात बसून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पोहोचले. दरम्यान चाचणी केल्यानंतर पृथ्वीवर परत येण्यापूर्वी ते कमी पृथ्वीच्या परिभ्रमण प्रयोगशाळेत आणखी एक आठवडा घालवण्याची शक्यता असेही इस्रोने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

सुनीता विल्यम्स यांनी इतिहास घडवला

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी बुधवारी (दि.५) तिसऱ्यांदा अंतराळात यशस्वी उड्डाण केले. सुनिता आणि त्यांच्या एका सहकाऱ्याने बोईंग कंपनीच्या स्टारलाइनर अंतराळयानातून यशस्वी उड्डाण केले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले सदस्य बनून सुनिता विल्यम्स यांनी नवीन इतिहास (Sunita Williams) घडवला. विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन जाणारी बोईंगची क्रू फ्लाइट चाचणी मोहीम अनेक विलंबानंतर फ्लोरिडामधील केप कॅनाव्हेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून प्रक्षेपित करण्यात आली. अशा मोहिमेवर उड्डाण करणारी पहिली महिला म्हणून भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांनी इतिहास घडवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news