तांत्रिक बिघाडामुळे अद्याप सुनीता विल्यम्स अवकाशातच

अंतराळातून परतण्यास अडचण
Sunita Williams still in space due to technical glitch
तांत्रिक बिघाडामुळे अद्याप सुनीता विल्यम्स अवकाशातचFile Photo

वॉशिंग्टन,वृत्तसंस्था: अमेरिकेतील मूळ भारतीय अंतराळवीर सुनीता विल्यम्स अन्य एका सहकाऱ्यासह तिसऱ्यांदा अवकाशात रवाना झाल्या होत्या. आता त्यांना अंतराळ स्थानकावरून परत येण्यात अडचण येत आहे.

अंतराळयानामधील तांत्रिक अडचण हे त्यामागचे कारण आहे. लवकरच ही अडचण दूर करून दोघे पृथ्वीवर परत येतील, असे अभियंत्यांनी सांगितले. मर्यादित इंधन शिल्लक आहे. त्यात स्टारलाइनरमध्ये ५ ठिकाणांहून हेलियम गळतीमुळे परतीचा प्रवास सुरू होऊ शकलेला नाही. स्टारलाइनरच्या भ्रस्टर्सनी काम करणे थांबवले आहे, अशी माहिती आहे.

सुनीता विल्यम्स यांनी इतिहास घडवला

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी बुधवारी (दि.५) तिसऱ्यांदा अंतराळात यशस्वी उड्डाण केले. सुनिता आणि त्यांच्या एका सहकाऱ्याने बोईंग कंपनीच्या स्टारलाइनर अंतराळयानातून यशस्वी उड्डाण केले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले सदस्य बनून सुनिता विल्यम्स यांनी नवीन इतिहास (Sunita Williams) घडवला.

विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन जाणारी बोईंगची क्रू फ्लाइट चाचणी मोहीम अनेक विलंबानंतर फ्लोरिडामधील केप कॅनाव्हेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून प्रक्षेपित करण्यात आली. अशा मोहिमेवर उड्डाण करणारी पहिली महिला म्हणून भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांनी इतिहास घडवला आहे.

‘या’ मोहिमांमध्ये अंतराळवीर सुनीता सहभागी

2012 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या प्रवासादरम्यान अंतराळात ट्रायथलॉन पूर्ण करणाऱ्या विल्यम्स या पहिल्या व्यक्ती ठरल्या होत्या. यूएस नेव्हल अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर विल्यम्स यांनी 1987 मध्ये यूएस नेव्हीमध्ये सामील झाल्या. विल्यम्स यांची 1998 मध्ये NASA द्वारे अंतराळवीर म्हणून निवड करण्यात आली होती. 2006 मध्ये मिशन 14/15 आणि 2012 मध्ये 32/33 या दोन अंतराळ मोहिमांमध्ये देखील सुनीता विल्यम्स यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news