Bangladesh Terror Arrest : मार्शल आर्ट्सच्या नावाखाली दहशतवादाचे धडे! बांगलादेशमधील विद्यार्थी नेत्याचा पर्दाफाश

'फताह कॉम्बॅट सिस्टम' संस्थेच्या विद्यार्थी आणि प्रशिक्षकाला अटक
Bangladesh terror arrest
Bangladesh terror arrest Pudhari
Published on
Updated on

Bangladesh terror arrest : बांगलादेशमधील दहशतवादविरोधी तपासात 'फताह कॉम्बॅट सिस्टम' (FCS) या मार्शल आर्ट्स प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी आणि प्रशिक्षकांना अटक करण्यात आली आहे. मार्शल आर्ट्स संस्थेच्या नावाखाली ही संस्‍था दहशतवादाला खतपाणी घालत असल्‍याने तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे. आता या संस्‍थेच्‍या च्या प्रमुखाला पोलिसांनी अटक केली आहे. ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या (DMP) 'काउंटर टेररिझम अँड ट्रान्सनॅशनल क्राईम' (CTTC) विभागाने ही कारवाई केली आहे.

'फताह कॉम्बॅट सिस्टम' संस्थेच्या विद्यार्थी आणि प्रशिक्षकाला अटक

'बांगलादेश संवाद संस्था' (BSS) या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले सर्वजण खुलना येथील 'फताह कॉम्बॅट सिस्टम' (FCS) या मार्शल आर्ट्स प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी आणि प्रशिक्षक असल्याचे कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी सांगितले.

Bangladesh terror arrest
India-Bangladesh Relation : सीमेवर 'मानवी ढाल'; जमात-ए-इस्लामीच्या घोषणेनंतर भारत-बांगलादेश सीमेवर तणाव वाढणार?

मोबाईलमधील व्हिडिओमुळे पर्दाफाश

मार्शल आर्ट्स प्रशिक्षक आणि FCS चा प्रमुख शाह अमानत साबीर याच्या मोबाईल फोनमधून एक व्‍हिडिओ आढळला होता. याचा तपास अधिकारी कसून चौकशी करत आहेत. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, हा व्हिडिओ २ मिनिटे २३ सेकंदांचा असून यामध्ये रात्रीच्या वेळी एका ग्रामीण रस्त्यावर स्फोट घडवून आणल्याचे, दहशतवादी घोषणाबाजी आणि साबीर हातात धारदार शस्त्र घेऊन धमक्या देत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओ क्लिपच्या पार्श्वभूमीत (बॅकग्राउंडला) 'आयसिस'च्या (ISIS) प्रचाराशी संबंधित असलेले एक अरबी गाणे वापरण्यात आले आहे.

Bangladesh terror arrest
West Bengal Illegal Immigrants | प. बंगालमधील ६०० हेक्टर जमीन BSF कडे; बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात अमित शहा ॲक्शन मोडमध्ये!

'नॅशनल सिटिझन्स पार्टी' संबंधिताचीही चौकशी

२०२४ मध्ये बांगलादेशात शेख हसीना यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनानंतर स्थापन झालेल्या 'नॅशनल सिटिझन्स पार्टी' (NCP) या विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या एका सदस्याचीही या प्रकरणात चौकशी केली जात आहे. बांगलादेशात मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या काळात या 'एनसीपी' पक्षाची स्थापना झाली होती.

Bangladesh terror arrest
Bangladesh Pakistan relations |बांगलादेशने आपले वरिष्ठ अधिकारी पाकिस्तानात का पाठवले? ७० च्या दशकानंतर प्रथमच मोठी घडामोड!

विद्यार्थी नेत्याची पक्षातून हकालपट्टी

दहशतवादविरोधी तपासाच्या संदर्भात अटक करण्यात आलेल्यांमध्ये नॅशनल सिटिझन्स पार्टीच्या गाझीपूर शहर निमंत्रक समितीचा सह-सदस्य सचिव अताउल्ला शाह याचाही समावेश आहे. त्याच्या अटकेनंतर ७ जुलै रोजी 'एनसीपी'ने त्याची पक्षातून हकालपट्टी केली. शाह याला ५ जुलै रोजी जत्राबारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 'मिनी कॉक्स बाजार' परिसरातील बालूर माठ येथून इतर सहा जणांसह अटक करण्यात आली होती. 'सीटीटीसी'चे प्रमुख शमशुल हक यांनी सांगितले की, या गुन्ह्यात FCS शी संबंधित १० ते १२ जणांची नावे असून त्यांच्यावर दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचा संशय आहे.

Bangladesh terror arrest
Siliguri Corridor |आता 'चिकन नेक' होणार आणखी मजबूत ! प. बंगालचे मुख्‍यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी घेतला मोठा निर्णय

१९ वर्षीय तरुणाला न्यायालयीन कोठडी

'फताह कॉम्बॅट सिस्टम' (FCS) शी संबंधित दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या ताहसीन इस्लाम या १९ वर्षीय तरुणाची न्यायालयाने तुरुंगात रवानगी केली आहे. 'फताह कॉम्बॅट सिस्टम'शी संबंधित संशयितांच्या योग्य तपासासाठी त्यांची कोठडीत चौकशी करणे आवश्यक आहे, हा पोलिसांचा युक्तिवाद मान्य करत ढाका मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट अलबिरुनी मीर यांनी हा आदेश दिला. ताहसीन इस्लाम याला भारताच्या सीमेला लागून असलेल्या जशोर जिल्ह्यातील त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्या घराच्या झडतीदरम्यान पोलिसांनी एक कोयता (मॅचेट) आणि अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे) जप्त केली असून, सध्या त्यांचा तपास सुरू आहे.

मार्शल आर्ट्सच्या नावाखाली दहशतवादाचे धडे

'फताह कॉम्बॅट सिस्टम' (FCS)ही स्वतःला बांगलादेशातील मार्शल आर्ट्स आणि स्वसंरक्षण संस्था म्हणून ओळखते. या संस्थेची स्थापना उस्ताझ शाह अमानत साबीर याने केली. मार्शल आर्ट्सच्या प्रशिक्षणाच्या बहाण्याने ही संस्था तरुणांचे बुद्धिभेद करते आणि त्यांना दहशतवादी कारवायांसाठी प्रवृत्त करते, अशा आरोपांनंतर ही संस्था दहशतवादविरोधी तपासाच्या रडारवर आली आहे. सीटीटीसी अधिकारी या संघटनेच्या निधीच्या (फंडिंग) स्रोतांची आणि कारवायांची चौकशी करत आहेत. साबीर याने मे महिन्यात खुलना येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारतीय प्रसारमाध्यमांसह बांगलादेशच्या कायदा अंमलबजावणी संस्थांवर कडाडून टीका केली होती, त्यानंतर तो तपास यंत्रणांच्या रडारवर आला होता. दहशतवादविरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, FCS ची सुरुवात फेब्रुवारी महिन्यात एक मार्शल आर्ट्स संस्था म्हणून झाली होती, ज्याच्या शाखा खुलना, जशोर सदर, अभयनगर, सिद्दीरपाशा, सुतारखाली आणि चांदपूर येथे आहेत.

Bangladesh terror arrest
India-Bangladesh Cooperation |युद्धाच्या छायेत भारताचा बांगलादेशला मदतीचा हात; ५,००० टन डिझेलचा पुरवठा सुरू

संस्थेच्या वेबसाईटवर काय म्हटलं आहे?

'फताह कॉम्बॅट सिस्टम' संस्थेच्या अधिकृत वेबसाईटनुसार, संस्थेचे वर्णन एक 'इस्लामिक, मार्शल आर्ट्स आणि स्वसंरक्षण संस्था' असे केले आहे. ही संस्था आमनेसामने लढाई, स्ट्रायकिंग, ग्रॅपलिंग, शस्त्रास्त्रे निकामी करणे (वेपन डिसआर्मिंग), सामरिक हालचाली (टॅक्टिकल मूव्हमेंट) आणि बचावात्मक कौशल्यांचे प्रशिक्षण देते, असेही या वेबसाईटवर नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news