Ayatollah Ali Khamenei Funeral | खामेनींच्या अंत्यविधीवेळी १४ महिन्यांच्या नातीची शवपेटी पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले

इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात खामेनींच्या कुटुंबातील अनेक सदस्य पडले होते मृत्युमुखी
Ayatollah Ali Khamenei Funeral
Ayatollah Ali Khamenei FuneralPudhari
Published on
Updated on

Ayatollah Ali Khamenei Funeral : इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या अंत्यसंस्कारासाठी तेहरानमध्ये हजारो नागरिक एकत्र आले आहेत. या अंत्यसंस्कार सोहळ्यातील एक अत्यंत भावूक आणि धक्कादायक दृश्य समोर आले आहे. खामेनी यांच्या पार्थिवाशेजारीच त्यांच्या अवघ्या १४ महिन्यांच्या चिमुरड्या नातीची शवपेटी देखील ठेवण्यात आली. ती पाहून उपस्थितांच्या आक्रोशाने संपूर्ण परिसर हेलावला. २८ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू होताच इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात खामेनी यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य मृत्युमुखी पडले. यामध्ये त्यांच्या १४ महिन्यांच्या चिमुरड्या नातीचाही समावेश होता. अंत्यसंस्कारावेळी खामेनी यांचे जावई, त्यांची मोठी मुलगी आणि इराणचे नवे सर्वोच्च नेते आयतौल्ला मोजताबा खामेनी यांच्या पत्नीलाही आदरांजली वाहण्यात आली.

भारतातील इराण दूतावासाने वाहिली आदरांजली

यापूर्वी भारतातील इराण दूतावासानेही या चिमुरडीला श्रद्धांजली वाहिली होती. त्यांनी म्हटले होते, "शहीद झहरा मोहम्मदी गोलपायेगानी. इस्लामिक क्रांतीचे शहीद नेते आयतौल्ला खामेनी यांची नात, जिला त्यांच्यासोबतच हौतात्म्य लाभले."

Ayatollah Ali Khamenei Funeral
Ayatollah Ali Khamenei Funeral | खामेनी यांच्या हत्येचा बदला घेणार; इराणचा अमेरिका-इस्रायलला इशारा

विविध देशातील प्रतिनिधी अंत्‍यविधीत सहभागी

खामेनी यांची राष्ट्रीय ध्वजात गुंडाळलेली शवपेटी तेहरानच्या 'ग्रँड मोसल्ला' येथे ठेवण्यात आली. तिथे इराणचे वरिष्ठ नेते, धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती आणि परदेशी पाहुण्यांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. या सोहळ्याला संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बगेर कलिबाफ, परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि अध्यक्ष मसूद पेझेश्कियान प्रामुख्याने उपस्थित होते. इराणच्या सरकारी माध्यमांनी प्रसारित केलेल्या फुटेजमध्ये काळे कपडे परिधान केलेले हजारो नागरिक प्रार्थनेसाठी जमल्याचे दिसले. तेथील पारंपरिक प्रथेनुसार, अनेकांनी आपले स्कार्फ आणि इतर वैयक्तिक वस्तू शवपेटीला स्पर्श करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या दिशेने फेकल्या. इराणमध्ये या प्रथेने आशीर्वाद मिळतात, अशी श्रद्धा आहे.

Ayatollah Ali Khamenei Funeral
Ali Khamenei Funeral Date : इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अली खामेनींवर तब्बल १३२ दिवसांनी होणार अंत्यसंस्कार!

शवपेटीवर शिया पंथातील महत्त्‍वाची घोषणा

नंतर या शवपेटीवर "या हुसेन" लिहिलेला लाल रंगाचा ध्वज घालण्यात आला. ही शिया पंथातील एक महत्त्वाची घोषणा असून, ती प्रेषित मोहम्मद यांचे नातू इमाम हुसेन यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ वापरली जाते. इराकच्या कर्बला येथील इमाम हुसेन यांच्या दर्ग्यातून हा ध्वज आणला होता. शिया परंपरेत हा लाल ध्वज अन्यायकारकपणे मारल्या गेलेल्या व्यक्तीच्या रक्ताचे आणि 'सूडाचे' प्रतीक मानला जातो.

Ayatollah Ali Khamenei Funeral
US Iran Hormuz Talks: मोठी घडामोड! होर्मुझवरून अखेर अमेरिका-इराण नरमले; युद्ध थांबवून दोहात निर्णायक चर्चा करणार

अंत्ययात्रा अनेक शहरांत जाणार

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, खामेनी यांचा अंत्यविधी पुढील काही दिवस सुरू राहणार आहे. त्यांचे पार्थिव इराण आणि शेजारील इराक मधील विविध शहरांमध्ये नेले जाईल. या पार्श्वभूमीवर तेहरानमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्ते बंद करण्यात आले असून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दरम्यान, वडिलांच्या निधनानंतर इराणचे नवे सर्वोच्च नेते बनलेले आयतौल्ला मोजताबा खामेनी हे सुरक्षेच्या कारणास्तव या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news