

Afghanistan Air Strike Pakistan: अफगाणिस्तान तालिबानच्या संरक्षण मंत्रालयानं दावा केला आहे की त्यांनी पाकिस्तानच्या अनेक लष्करी तळांवर यशस्वीरित्या एअर स्ट्राईक केला आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ही कारवाई पाकिस्तानकडून अफगाणिस्तानमध्ये करण्यात आलेल्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आली आहे.
तालिबान संरक्षण मंत्रालयानं वक्तव्य प्रसिद्ध करत आमच्या वायू सेनेनं रावळपिंडीमधील नूर खान एअर बेस, क्वेटामधील १२ कोअर, खैबर पख्तूनख्वामधील मोहम्मद एजन्सी आणि घलानी लष्करी तळावर एअर स्टाईक केला.
वक्तव्यात या ठिकाणी अचूक आणि टार्गेटेड हवाई हल्ले करण्यात आले. त्यामुळं पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानी सैन्यानं काबुल, बगराम एअर बेस आणि काही इतर ठिकाणी गेल्या रात्री हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.
तालिबानने आपल्या वक्तव्यात जर पाकिस्तानकडून त्यांच्या एअर स्पेसचं कोणत्याही प्रकारचं उल्लंघन झालं तर किंवा पुन्हा आक्रमक कारवाई झाली तर त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येईल. अफगाणिस्तान तालिबानच्या या एअर स्ट्राईकच्या दाव्यावर अजून तरी पाकिस्तानकडून अधिकृतरित्या कोणती माहिती समोर आलेली नाही. मात्र या एअर स्ट्राईकनंतर तणाव वाढण्याची शक्यता आहे.
अल जजीरा या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये जोरदार स्फोटाचे आवाज ऐकू आले. तालिबान सरकारच्या म्हणण्यानुसार त्यांच्या सैन्यानं पाकिस्तानी फायटर जेस्टवर फायरिंग केली होती. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्ष गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे. रविवारी सकाळी पाकिस्तानी फाटर जेट्स अफगाण हवाई हद्दीत घुसले होते. त्यानंतर अँटी एअरक्राफ्ट मिसाईल डिफेन्स सिस्टम अॅक्टिव्हेट करून त्याला प्रत्युत्तर देण्यात आलं.
तालिबानने पाकिस्तानी विमानांनी बगराम एअर बेसला टार्गेट करण्याचा देखील प्रयत्न केल्याचा दावा केला. मात्र हा हल्ला आम्ही निष्प्रभ केला. बगराम हा अमेरिकेचा पूर्विचा लष्करी अड्डा होता. या लष्करी तळाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी पुन्हा रस दाखलवा होता.