Amazon Rainforest Awa Tribe : अमॅझॉन जंगलातील 'अवा' जमातीवर नामशेष होण्याचं संकट; दुर्मिळ फोटोंनी उघड केले भयानक वास्तव्य

आदिवासींच्‍या हक्‍कांसाठी लढणार्‍या 'सर्व्हायव्हल इंटरनॅशनल'ने व्‍यक्‍त केली तीव्र चिंता
Amazon Rainforest Awa Tribe : अमॅझॉन जंगलातील 'अवा' जमातीवर नामशेष होण्याचं संकट; दुर्मिळ फोटोंनी उघड केले भयानक वास्तव्य
Published on: 
Updated on: 

Amazon Rainforest Awa Tribe : 'गार्डियन्स ऑफ द ॲमेझॉन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ॲमेझॉन जंगलातील मूळ निवासी असणार्‍या 'अवा' आदिवासी सध्‍या अत्यंत कठीण परिस्थितीत आहेत. त्यांच्या प्रदेशात सर्व बाजूंनी घुसखोरी होत असल्याने, त्यांना ॲमेझॉन वर्षावनाच्या एका अत्यंत लहान भागात मर्यादित राहावे लागत आहे. एकांतप्रिय अशी ओळख असणारी या आदिवासी गटाची दुर्मिळ छायाचित्रे आदिवासींच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या ब्रिटनस्थित 'सर्व्हायव्हल इंटरनॅशनल' संस्थेने प्रसिद्ध केली आहेत.

'अवा' टाळतात बाह्य जगाशी संपर्क

यासंदर्भात 'रॉयर्टस'ने दिलेल्‍या वृत्तात म्‍हटलं आहे की, ब्रिटनस्थित आदिवासी लोकांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या 'सर्व्हायव्हल इंटरनॅशनल' या संस्थेने मंगळवारी छायाचित्रे प्रसिद्ध केली. त्यांच्या मते, ब्राझीलच्या ईशान्येकडील मारानाओ राज्यातील एका प्रदेशात काही दिवसांपूर्वी सरकारी पथक आणि अन्नाची मागणी करणाऱ्या सुमारे २० संपर्कहीन 'अवा' आदिवासी लोकांमध्ये झालेली ही एक "ऐतिहासिक भेट" होती. 'सर्व्हायव्हल इंटरनॅशनल' संस्‍था बाहेरील जगाची जाणीव असूनही बाहेरील लोकांशी संपर्क टाळणार्‍या आदिवासी जमातीच्‍या कल्‍याणाचे काम करते.

Amazon Rainforest Awa Tribe : अमॅझॉन जंगलातील 'अवा' जमातीवर नामशेष होण्याचं संकट; दुर्मिळ फोटोंनी उघड केले भयानक वास्तव्य
Amazon Rainforest | ॲमेझॉन जंगलात मलेरिया निर्मूलनानंतर पुन्हा वाढला आजाराचा प्रादुर्भाव

प्रथम अन्‍नाची मागणी

"त्यांच्या प्रदेशात प्रवेश करणाऱ्या बाहेरील लोकांच्या दबावामुळे अवा आदिवासी जमातीच्‍या लोकांनी अन्नाची मागणी केली असावी. अलीकडच्या काळात, निश्चितपणे काही दशकांपासून, 'अवा' लोकांनी कधीच अन्‍नाची मागणी कोणाकडे केली नव्‍हती. मात्र असा दृष्टिकोन स्वीकारला गेला नव्हता," असे 'सर्व्हायव्हल इंटरनॅशनल'ने म्हटले आहे.

ब्राझील सरकारकडून संपर्क नाही

ब्राझीलची आदिवासी व्यवहार संस्था 'फुनाई'ने रॉयटर्सला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मारानाओमधील अरारिबोइया आदिवासी भूमीतील एका गावाशी संवाद साधणाऱ्या एकाकी 'अवा' जमातीच्या लोकांचे सोशल मीडियावर शेअर केलेले व्हिडिओ आणि वृत्तांतांचे ते पुनरावलोकन करत आहेत. त्यांनी संपर्काच्या परिस्थितीसाठी एक आपत्कालीन योजना सक्रिय केली आहे. आदिवासी लोकांसाठी आरोग्याचे धोके कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ब्राझीलचे सरकार या गटाशी संपर्क साधू इच्छित नाही आणि त्यांचे धोरण संपर्क न साधण्याचेच आहे, असा दावाही 'फुनाई'ने केला आहे.

Amazon Rainforest Awa Tribe : अमॅझॉन जंगलातील 'अवा' जमातीवर नामशेष होण्याचं संकट; दुर्मिळ फोटोंनी उघड केले भयानक वास्तव्य
New Monkey Species | अ‍ॅमेझॉनच्या जंगलात सापडल्या ‘हाऊलर माकडां’च्या नव्या प्रजाती

'अवा' जमातीचे लोक स्वेच्छेने राहतात एकांतवासात

'फुनाई'च्या मते, 'अवा' हे वायव्य मारानाओमधील तुपी-ग्वारानी लोक आहेत. यातील काही जण स्वेच्छेने एकांतवासात राहत आहेत. 'सर्व्हायव्हल इंटरनॅशनल'ने म्हटले आहे की, 'गार्डियन्स ऑफ द ॲमेझॉन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मूळनिवासी लोकांच्या गटाच्या विनंतीवरून हे फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहेत. एकांतप्रिय असणारा आदिवासींचा हा गट अवैध लाकूडतोड करणारे आणि पशुपालकांविरुद्ध मोहीम चालवतो.

अनेकांच्या अतिक्रमणामुळे अस्तित्वच धोक्यात

अलीकडच्या दशकांत जगातील सर्वात मोठे वर्षावन असलेल्या ॲमेझॉनमधील अनेक स्वतंत्र (बाह्य जगाशी संपर्क नसलेले) आदिवासी गट, बेकायदेशीर खाणकाम करणारे, लाकूडतोड करणारे आणि पशुपालक यांच्या अतिक्रमणामुळे 'अवा' जमातीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

Amazon Rainforest Awa Tribe : अमॅझॉन जंगलातील 'अवा' जमातीवर नामशेष होण्याचं संकट; दुर्मिळ फोटोंनी उघड केले भयानक वास्तव्य
Manaus City : मधोमध सरळ रेषा अन् एका बाजूला थेट अमेझॉनचे जंगल; काय आहे या अजब शहराचे सत्य?

चौही बाजूंनी घुसखोरीमुळे सर्वत्र विनाश : कॅरोलिन पिअर्स

"बाह्य जगाशी संपर्क नसलेले 'अवा' (Awá) आदिवासी अत्यंत कठीण परिस्थितीत आहेत. त्यांच्या प्रदेशात सर्व बाजूंनी घुसखोरी होत असल्याने, त्यांना ॲमेझॉन वर्षावनाच्या एका अत्यंत लहान भागात मर्यादित राहावे लागत आहे, जिथे त्यांच्या भोवती सर्वत्र विनाश पसरलेला आहे," अशी माहिती 'सर्व्हायव्हल इंटरनॅशनल'च्या संचालिका कॅरोलिन पिअर्स यांनी दिली.

बाह्य जगाशी संपर्क नसणाऱ्या आदिवासींचे १० देशांमध्ये १९६ गट

'सर्व्हायव्हल इंटरनॅशनल' या संस्थेने बाह्य जगाशी कोणताही संपर्क नसणाऱ्या दक्षिण अमेरिका, आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रातील १० देशांमध्ये अशा १९६ आदिवासी गटांची ओळख पटवली आहे. यापैकी सुमारे ९५% गट ॲमेझॉनमध्ये आहेत, ज्यामध्ये केवळ ब्राझीलमध्येच १२४ गट आहेत.

Amazon Rainforest Awa Tribe : अमॅझॉन जंगलातील 'अवा' जमातीवर नामशेष होण्याचं संकट; दुर्मिळ फोटोंनी उघड केले भयानक वास्तव्य
अ‍ॅमेझॉनच्या जंगलात पिरॅमिडसारखा रहस्यमय डोंगर

...तर 'अवा' आदिवासींच्या अस्तित्वाला गंभीर धोका

मरान्हाओ येथील आदिवासी संघटना 'कोआपिमा' (COAPIMA) ने मंगळवारी (दि. १७ नोव्‍हेंबर) सांगितले की, 'अवा' आदिवासींशी झालेला हा संपर्क, संबंधित यंत्रणांनी अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे महत्त्व अधोरेखित करतो. कारण, अशा प्रकारे अनियोजित संपर्क झाल्यास, या स्वतंत्र आदिवासी गटांना विविध आजारांचा संसर्ग होण्यासह त्यांच्या अस्तित्वाला इतर अनेक गंभीर धोके निर्माण होऊ शकतात, असेही 'सर्व्हायव्हल इंटरनॅशनल'ने म्‍हटलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.