वॉशिंग्टन: खलिस्तानी समर्थकांचा हल्ल्याचा प्रयत्न असफल; भारतीय दूतवासाला शिविगाळ करत धमकावले

वॉशिंग्टन: खलिस्तानी समर्थकांचा हल्ल्याचा प्रयत्न असफल; भारतीय दूतवासाला शिविगाळ करत धमकावले

पुढारी ऑनलाईन: अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील खलिस्तानी समर्थकांनी भारतीय दूतवासावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान अमेरिकेतील भारतीय राजदूत तरनजीत सिंग संधू आणि येथील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. येथील खलिस्तानी समर्थकांच्या एका गटाने भारतीय दूतावासाच्या परिसरात हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र येथील अमेरिकन पोलीस आणि गुप्तचर विभागाच्या तत्परतेमुळे खलिस्तानी समर्थकांचा भारतीय दुतवासावरील हल्ल्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. पोलिस आणि प्रशासनाच्या प्रसंगसावधतेमुळे मोठी घटना टळली असल्याची माहिती येथील माध्यमांनी दिली आहे.

भारतीय राजदूताला शिवीगाळ

वॉशिंग्टन डीसी येथील भारतीय दूतावासाबाहेर शनिवारी (दि.२५) फुटीरतावादी शिखांचा एक गट जमला. या दरम्यान अनेक फुटीरतावादी नेत्यांनी या गटाला संबोधित करत भारताविरोधात रान उठवले. यावेळी भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांना अपशब्द बोलण्यात आले. मात्र, घटनेच्या वेळी भारतीय राजदूत दूतावासात उपस्थित नव्हते. या दरम्यान कट्टरपंथी खलिस्तानी लोक जमावाला दूतावासावर हल्ला करण्यासाठी चिथावणी देताना दिसले.

लाठ्या-काठ्या घेऊन खलिस्तानी समर्थक दूतावासावर

अमेरिकेतील खलिस्तानी समर्थक आणि त्यांचे सहकारी लाठ्या-काठ्यांसह वॉशिंग्टन येथील दूतवासाबाहेर जमले होते. दरम्यान त्यांनी सोबत आणलेले साहित्य जवळच्या उद्यानात ठेवले होते. भारतीय दूतावासावर हल्ला आणि तोडफोड करण्याच्या तयारीने हे समर्थक तेथे पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी खलिस्तानी समर्थक सॅन फ्रान्सिस्को आणि लंडनसारख्या भारतीय दूतावासावर हल्ला करून तिरंग्याचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे खलिस्तान्यांना या हल्ल्यात यश आले नाही.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news