Kangana Ranaut चा Diljit Dosanjh वर निशाणा, खलिस्तानींना समर्थन केल्याचा आरोप

Kangana Ranaut -Diljit Dosanjh
Kangana Ranaut -Diljit Dosanjh
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कंगना रानौतने पुन्हा एकदा गायक, अभिनेता दिलजीत दोसांझवर निशाणा साधला आहे. पंजाब पोलिसांद्वारा खलिस्तान समर्थक आणि वारस पंजाब डेचा प्रमुख अमृतपाल सिंह याच्यावर कारवाई दरम्यान कंगनाने दिलजीतसाठीही (Kangana Ranaut) एका इशारा देणारी पोस्ट लिहिली आहे. तिने सध्या सोशल मीडियावर सुरु असलेल्या एका लोकप्रिय मीमचा फोटो शेअर करत ट्विट केलं आहे.

कंगनाने ट्विटर आणि इन्स्टाग्राम स्टोरीजवर एक पोस्ट शेअर केला आहे. ज्यामध्ये अनेक प्रकारच्या डाळी दाखवण्यात आले होत. ज्यावर 'पल्स आई पल्स' असं लिहिलेलं होतं. तिने आपल्या ट्विटमध्ये दिलजीतला टॅग करत लिहिलं 'फक्त म्हणत आहे'. तिने इन्स्टाग्राम स्टोरीजवर एक खलिस्तान स्टिकर जोडलं आहे, ज्यामध्ये क्रॉस आऊट शब्द होता. तिने म्हटलं, "दिलजीत दोसांझ जी पोल्स आली पोल्स."
पुढचा नंबर तुझा आहे… (Kangana Ranaut)

khalistani
khalistani

दुसऱ्या पोस्टमध्ये तिने लिहिलंय- "खलिस्तान्यांचा समर्थन करणारे सर्व लोकांना आठवणीत राहू दे की, पुढील नंबर तुमचा आहे. पोल्स आले आहेत, ही ती वेळ नाही, जेव्हा कुणीही काहीही करत होतं. देशासोबत गद्दारी वा तुकडे करण्याचा प्रयत्न आता महाग पडणार. तुमचा नंबर पुढचा आहे, पोलिस येथे आहेत. आता कोणीही आपली मनमानी करू शकत नाही. देशाला धोखा देणे वा तुकडे करायला, खूप वेळ लागेल."

पंजाब पोलिसांद्वारा शनिवारी अमृतपाल सिंह आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात अभियान सुरू केल्यानंतर कंगनाची ही पोस्ट आलीय. पोलिसांनी म्हटलं की, याप्रकरणी आतापर्यंत एकूण ११४ जणांना अटक झालीय. आयएसआय आणि परदेशी फंडिंग बद्दल खूप संशय आहे. २०२० मध्ये लुधियानाचे काँग्रेस खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनी दिलजीतवर खलिस्तान्यांचे समर्थन केल्याचा आरोप केला आहे. दिलजीतने त्यावेळी उत्तर दिलं होतं की, 'मी एक भारतीय करदाता आहे, जे नेहमी गरजेच्या वेळी देश आणि पंजाबसोबत खांद्याला खांदा मिळवून उभा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news