Apple : अमेरिकेत विकले जाणारे बहुतेक iPhones 'मेड इन इंडिया'; ॲपलचे CEO टीम कुक यांचा मोठा खुलासा

Apple CEO Tim Cook यांनी खुलासा केला आहे की, अमेरिकेत विकले गेलेले बहुतांश iPhones भारतात तयार केले गेले आहेत.
Apple CEO Tim Cook
Apple CEO Tim Cookpudhari photo
Published on
Updated on

Apple CEO Tim Cook

नवी दिल्ली : अमेरिकेच्या बाजारपेठेत विकले जाणारे बहुतांश आयफोन आता भारतात तयार होत असल्याची महत्त्वपूर्ण माहिती ॲपलचे सीईओ टीम कुक यांनी दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपलच्या या धोरणावर वारंवार टीका करूनही, भारताने आता अमेरिकन बाजारपेठेसाठी आयफोन उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून स्थान मिळवले आहे. चीन आता अमेरिकेव्यतिरिक्त इतर देशांच्या बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

३१ जुलै रोजी ॲपलच्या तिमाही निकालांनंतर बोलताना टीम कुक यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, "उत्पादनाच्या देशाच्या संदर्भात सांगायचे झाल्यास, गेल्या तिमाहीप्रमाणेच परिस्थिती आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या तिमाहीत म्हणजेच दुसऱ्या तिमाहीत अमेरिकेत विकले गेलेले बहुतेक आयफोन 'मेड इन इंडिया' आहेत."

Apple CEO Tim Cook
India-Russia Oil : भारताकडून रशियाला युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी आर्थिक रसद; अमेरिकेचा गंभीर आरोप

MacBook, iPad, Apple Watch साठी व्हिएतनाम मुख्य उत्पादन केंद्र

ॲपलने आपल्या उत्पादन धोरणात मोठे बदल केले आहेत. आयफोनसाठी भारताला पसंती दिली जात असताना, इतर उत्पादनांसाठी व्हिएतनाम हे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. MacBook, iPad, Apple Watch सारख्या इतर Apple उत्पादनांसाठी व्हिएतनाम हे आता अमेरिकन मागणीसाठी प्रमुख उत्पादन केंद्र झाले आहे. “जगातील इतर देशांसाठी असलेली उत्पादने बहुतेक प्रमाणात चीनमधून येत आहेत,” असेही टीम कुक यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प यांचा भारतातील उत्पादनाला विरोध

अमेरिकन ग्राहकांसाठी भारतात आयफोन बनवण्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उघडपणे विरोध दर्शवला होता. मे महिन्यात दोहा दौऱ्यावर असताना ट्रम्प म्हणाले होते, "माझी टीम कुकसोबत थोडी अडचण झाली आहे... मी त्यांना म्हणालो, मित्रा, मी तुला खूप चांगली वागणूक देत आहे... पण आता मी ऐकतोय की तू भारतात उत्पादन करत आहेस. भारतात उत्पादन ते मला नकोय." दरम्यान, गेल्या आठवड्यात ट्रम्प प्रशासनाने भारतातून होणाऱ्या आयातीवर २५ टक्के शुल्क जाहीर केले आहे. सध्या स्मार्टफोन, संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांना यातून सूट देण्यात आली असली तरी, भविष्यात ही परिस्थिती बदलू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Apple CEO Tim Cook
Indian Army: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारतीय सैन्यात मोठे बदल; प्रत्येक विभागात 'ड्रोन युनिट', काय आहे रुद्र, भैरव ब्रिगेड?

भारतात ॲपलची विक्रमी कमाई

टीम कुक यांच्या वक्तव्यावरून ॲपलचे भारताकडे केवळ उत्पादन केंद्र म्हणूनच नव्हे, तर एक वेगाने वाढणारी बाजारपेठ म्हणूनही किती लक्ष आहे, हे स्पष्ट होते. त्यांनी सांगितले की, ॲपलला भारतात, विशेषतः आयफोनच्या विक्रीतून, विक्रमी महसूल वाढ दिसत आहे. "आम्ही प्रत्येक भौगोलिक विभागात आयफोनची वाढ पाहिली. भारत, मध्य पूर्व, दक्षिण आशिया आणि ब्राझील यांसारख्या उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये तर दुहेरी अंकी वाढ झाली आहे," असे कुक म्हणाले. जागतिक स्तरावर, ॲपलने तिमाही महसुलात १० टक्के वाढ नोंदवत ९४ अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठला आहे. जून तिमाहीत विक्रमी महसूल मिळवणाऱ्या दोन डझनहून अधिक देशांमध्ये भारताचा समावेश होता. याचवेळी, टीम कुक यांनी भारतात अधिक स्टोअर्स उघडून रिटेल क्षेत्रात विस्तार करण्याच्या ॲपलच्या योजनांबद्दलही माहिती दिली.

अमेरिकेच्या टॅरिफ्सवर टीम कुक काय म्हणाले?

अमेरिकेच्या शुल्क धोरणांच्या जागतिक परिणामावर भाष्य करताना कुक म्हणाले की, परिस्थिती अजूनही बदलत आहे. "जून तिमाहीत, आम्हाला शुल्काशी संबंधित सुमारे ८०० दशलक्ष डॉलर्सचा खर्च आला. सप्टेंबरच्या तिमाहीसाठी, जर सध्याचे जागतिक शुल्क दर आणि धोरणे बदलली नाहीत, तर आमच्या खर्चात सुमारे १.१ अब्ज डॉलर्सची भर पडेल, असा आमचा अंदाज आहे." भविष्यातील शुल्क धोरणांनुसार हे आकडे बदलू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news