Amazon Web Services down : ॲमेझॉनच्या क्लाऊड सेवेत अडथळा; जगभरातील वेबसाइट्स व ॲप्स ठप्प

अनेक डिजिटल प्लॅटफॉर्मवर परिणाम, काही सेवा हळूहळू पूर्वपदावर
 Amazon Web Services down : ॲमेझॉनच्या क्लाऊड सेवेत अडथळा; जगभरातील वेबसाइट्स व ॲप्स ठप्प
Published on
Updated on

Amazon Web Services down

नवी दिल्ली : ॲमेझॉनच्या क्लाऊड सेवा विभागात (Amazon Web Services - AWS) सोमवारी (दि. २० ऑक्टोबर) मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने जगभरातील अनेक प्रमुख वेबसाइट्स आणि मोबाइल अॅप्स ठप्प झाले. जवळपास एक तास सेवांमध्ये व्यत्यय राहिल्यानंतर काही प्लॅटफॉर्म आता हळूहळू पूर्ववत होत आहेत.

AWS मधील तांत्रिक बिघाडामुळे डिजिटल सेवा ठप्प

ऑनलाइन सेवा ट्रॅक करणाऱ्या DownDetector या संकेतस्थळानुसार, ॲमेझॉनच्या क्लाऊड प्लॅटफॉर्म ‘AWS’ मध्ये झालेल्या बिघाडामुळे Robinhood, Snapchat आणि Perplexity AI यांसारख्या लोकप्रिय अॅप्सनी काम करणे थांबवले. जगातील इंटरनेट पायाभूत सुविधांमध्ये AWS चा मोठा वाटा असल्याने त्याचा परिणाम विस्तृत प्रमाणावर झाला.अमेरिकेत AWS साठी २,००० हून अधिक बिघाडांच्या नोंदी झाल्या असून, अनेक वापरकर्त्यांना डिजिटल सेवा आणि अॅप्समध्ये प्रवेश करण्यात अडचणी येत असल्याचे DownDetectorने म्हटले आहे.ॲमेझॉनच्या स्वतःच्या सेवाही या बिघाडाच्या कक्षेबाहेर राहू शकल्या नाहीत. Amazon.com, Prime Video आणि Alexa या सेवांनाही कनेक्टिव्हिटी समस्या जाणवली.

 Amazon Web Services down : ॲमेझॉनच्या क्लाऊड सेवेत अडथळा; जगभरातील वेबसाइट्स व ॲप्स ठप्प
Amazon ने ग्राहकांना प्राइम सबस्क्रिप्शनसाठी फसवलं; २.५ अब्ज डॉलरचा दंड, वाचा नक्की काय घडलं?

Perplexity AI ची पुष्टी

Perplexity AI चे सीईओ अरविंद श्रीनिवास यांनी एक्‍स पोस्‍ट केली की, “ही समस्‍या AWS-संबंधित तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झाली असून, आमची टीम ती दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे.”याशिवाय PayPal, Venmo यांसह इतर अनेक लोकप्रिय अॅप्स आणि वेबसाइट्समध्येही अधूनमधून सेवा खंडित झाल्याचे दिसून आले.

 Amazon Web Services down : ॲमेझॉनच्या क्लाऊड सेवेत अडथळा; जगभरातील वेबसाइट्स व ॲप्स ठप्प
Amazon Now India launch | क्विक कॉमर्सची शर्यत आणखी वेगवान होणार Blinkit-Swiggy ला टक्कर देण्यासाठी Amazon सज्ज, आता 10 मिनिटांत डिलिव्हरी

प्रभावित प्लॅटफॉर्म्सची यादी

AWS सर्व्हरवर अवलंबून असलेल्या अनेक डिजिटल साधनांवर व अॅप्सवर या बिघाडाचा परिणाम झाला. यामध्‍ये कॅन्वा (Canva), कॅनव्हास (Canvas), क्रंचीरोळ (Crunchyroll), रोब्लॉक्स (Roblox), रेनबो सिक्स सीज (Rainbow Six Siege), कॉइनबेस (Coinbase), ड्युओलिंगो (Duolingo), गुडरीड्स (Goodreads), रिंग (Ring), फोर्टनाईट (Fortnite), ॲपल टीव्ही (Apple TV), व्हेरायझन (Verizon), चाइम (Chime), मॅकडोनाल्ड्स अ‍ॅप (the McDonald's app) आणि पीयूबीजी बॅटलग्राउंड्स (PUBG Battlegrounds) यांचा समावेश आहे.

 Amazon Web Services down : ॲमेझॉनच्या क्लाऊड सेवेत अडथळा; जगभरातील वेबसाइट्स व ॲप्स ठप्प
Amazon founder Jeff Bezos | जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस यांची मोठी घोषणा, संपत्तीमधील मोठा हिस्सा दान करणार

परिस्थिती हळूहळू सुधारतेय

सोमवार दुपारपर्यंत काही सेवा पूर्वपदावर येऊ लागल्या असल्या, तरी सोशल मीडियावर वापरकर्त्यांकडून अजूनही अडचणींची नोंद होत आहे.ॲमेझॉनकडून मात्र या तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण किंवा तो किती काळ सुरू राहिला याबाबत अधिकृत निवेदन देण्यात आलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news