Amazon founder Jeff Bezos | जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस यांची मोठी घोषणा, संपत्तीमधील मोठा हिस्सा दान करणार

Amazon founder Jeff Bezos | जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस यांची मोठी घोषणा, संपत्तीमधील मोठा हिस्सा दान करणार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (Amazon founder Jeff Bezos) त्यांची बहुतांश संपत्ती चॅरिटीला दान करणार आहेत. CNN ला दिलेल्या मुलाखतीत याबाबत त्यांनी खुलासा केला आहे. त्यांच्या १२४ अब्ज डॉलर संपत्तीपैकी मोठा हिस्सा ते हवामान बदल, सामाजिक आणि राजकीय असमानता या क्षेत्रात काम करणाऱ्या चॅरिटींना मदत म्हणून देणार आहेत.

देशातील संगीत स्टार आणि मानवतावादी कार्यकर्त्या डॉली पार्टन यांना १०० दक्षलक्ष डॉलरची देणगी दिल्यानंतर बेझोस यांनी त्यांची ही योजना उघड केली आहे. जेफ बेझोस यांचा त्यांची बहुतांश संपत्ती त्यांच्या हयातीत दान करण्याचा मानस आहे. है पैसे ते हवामान बदलाशी लढण्यासाठी आणि असमानता कमी करण्यासाठी देणार आहेत.

सीएनएनने मुलाखतीदरम्यान प्रश्न केला होता की, तुमची बहुतांश संपत्ती तुमच्या हयातीत दान करण्याचा तुमचा मानस आहे का?. त्यावर बेझोस यांनी "होय, मी सपंत्ती दान करणार आहे." असे उत्तर दिले. ते पैसे नेमके कोठे खर्च करणार किंवा दान करणार याबद्दल त्यांनी तपशील उघड केलेला नाही. पण त्यांनी, मोठ्या संपत्तीचे विभाजन कसे करायचे याचा निर्णय घेणे ही सध्या त्यांची सर्वात मोठी अडचण असल्याचे नमूद केले.

यापूर्वी त्यांनी बेझोस अर्थ फंडला (Bezos Earth Fund) १० अब्ज देण्याचे आश्वासन दिले होते. २०२० मध्ये त्यांनी हवामान बदलाशी लढण्यास मदत करण्यासाठी बेझोस अर्थ फंडची निर्मिती केली होती. बेझोस आणि इतर उद्योजकांनी पृथ्वीवरील समस्या सोडवण्याऐवजी अंतराळात प्रचंड पैसा खर्च केल्याबद्दल टीका झाली होती. त्यानंतर बेझोस यांनी हे पाऊल उचलले आहे. २०२१ मध्ये त्यांनी Amazon चे मुख्य कार्यकारी पद सोडले होते. पण Amazon बोर्डाच्या अध्यक्षपदी ते कायम आहेत. वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्र आणि ब्ल्यू ओरिजिन ही अवकाश पर्यटन कंपनीची मालकी त्यांच्याकडे आहे. (Amazon founder Jeff Bezos)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news