Pakistan Semi Final scenario: 'कुदरत का निजाम' म्हणणाऱ्या पाकिस्तानचे लंकेत होणार दहन...? असं असेल NRR चं अवघड समीकरण

Pakistan Semi Final scenario
Pakistan Semi Final scenariopudhari photo
Published on
Updated on

Pakistan Semi Final scenario: टी २० वर्ल्डकप २०२६ च्या सुपर ८ मधील सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करत सेमी फायनलमधील आपलं स्थान पक्के केले. त्याचबरोबर या सामन्यातील इंग्लंडच्या विजयामुळं पाकिस्तानच्या सेमी फायनल गाठण्याच्या मनसुब्याला तगडा झटका बसला आहे. पाकिस्तानत जवळपास वर्ल्डकपमधून बाहेर पडली आहे. इंग्लंडनं सुपर ८ च्या ग्रुप २ मध्ये ६ गुणांसह अव्वल स्थान पटकावलं आहे. दुसरीकडं न्यूझीलंडचे ३ गुण असून +1.390 च्या नेट रनरेटसह ते दुसऱ्या स्थानावर आहेत. दोन सामन्यात पाकिस्तानचा १ गुण झाला आहे. त्यांचे नेट रनरेट हे -0.461 इतकं आहे.

Pakistan Semi Final scenario
T20 World Cup 2026: भारत जिंकला तर सेमीफायनलमध्ये कोणत्या संघाशी होणार सामना? काय आहे समीकरण?

कागदावर पाकिस्ताननं जर श्रीलंकेचा पराभव केला तर ते तीन गुणांपर्यंत पोहचतात. मात्र पाकिस्तानला फक्त विजय नाही तर चांगला विजय गरजेचा आहे. तरच ते सेमी फायनल खेळू शकतात. मात्र त्यासाठी त्यांना त्यांचे नेट रनरेट सुधारावे लागले. हे काम अशक्य नसलं तरी टी २० फॉरमॅटमध्ये अत्यंत कठीण नक्कीच आहे.

पाकिस्तान कसा होऊ शकतो पात्र

पाकिस्तानला श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात आपला सर्वोच्च खेळ करावा लागले. हा सामना पल्लेकेले इथं होणार आहे. पाकिस्तानला या मैदानावर आतापर्यंत तरी चांगली कामगिरी करता आलेली नाही. सर्वात आधी जर पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी केली तर जवळपास त्यांना ६४ ते ६५ धावांनी विजय मिळवावा लागणार आहे. हा विजय ते कोणते टार्गेट सेट करतात त्यावर अवलंबून असणार आहे.

जर पाकिस्ताननं प्रथम गोलंदाजी केली तर त्यांना श्रीलंका जे टार्गेट देईल ते टार्गेट १३ षटकाच्या आत पार करावं लागणार आहे.

पाकिस्तान जेवढ्या जास्त धावा करेल तेवढ्या मोठ्या धावांच्या फरकानं त्यांना सामना जिंकावा लागणार आहे. त्यांनी जर १७० धावांच्या आसपास टार्गेट सेट केलं तर त्यांना श्रीलंकेला निदान ६४ धावांनी पराभूत करावं लागणार आहे.

जर श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करताना १७० धावा केल्या तर पाकिस्तानला हे टार्गेट १३ षटकांच्या आत पूर्ण करावं लागणार आहे. तरच नेट रनरेट हे पाकिस्तानच्या बाजूला जाईल. इथं एक दोन चेंडू देखील सगळं चित्र पालटू शकतात.

Pakistan Semi Final scenario
T20 World Cup 2026 | कुणीतरी कपिलदेव बनण्याची गरज

सामना वॉशआऊट झाला तर..?

सुपर ८ मधील पाकिस्तान - न्यूझीलंड यांच्यातील सामना वॉशआऊट झाला होता. त्यात पाकिस्तान इंग्लंडकडून हरली, त्यामुळं पाकिस्तान आता स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. अशातच जर सुपर ८ मधील त्यांचा शेवटचा सामना देखील वॉशआऊट झाला तर त्यांचा २ गुणांसह कडेलोट होईल.

Pakistan Semi Final scenario
Saurav Ganguly: आता पाकिस्तानविरूद्ध एकही मॅच नको; ICC स्पर्धांमध्येही नको...

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर आधीत स्पर्धेतून बाहेर गेलेल्या श्रीलंकेचा हा घरच्या प्रेक्षकांसमोर या स्पर्धेतील शेवटचा सामना असणार आहे. ते आपल्या वर्ल्डकप मोहीमेची सांगता विजयाने करण्यासाठी उत्सुक असतील. पाकिस्तानसाठी या सामन्यात प्रथम गोलंदाजी करत लंकेला १०० धावांच्या आसपास ठेवून ते टार्गेट तडाखेबाज फलंदाजी करत १२ षटकात पूर्ण करावं लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news