Covaxin doses : भारताकडून अफगानिस्तानला ५ लाख कोव्हॅक्सिन डोसचा पुरवठा - पुढारी

Covaxin doses : भारताकडून अफगानिस्तानला ५ लाख कोव्हॅक्सिन डोसचा पुरवठा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

भारताने कोरोना विरोधी कोव्हॅक्सिन ( Covaxin doses )  लसीचे ५ लाख डोस अफगानिस्तानला पाठवले आहे. काबुल स्थित इंदिरा गांधी रूग्णालयात ही वैद्यकीय मदत पाठवण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी यांसबंधी माहिती दिली. पुढील आठवड्यात लसीचे आणखी पाच लाख डोस अफगानिस्तानला पुरवण्यात येतील, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

अफगानिस्तानातील नागरिकांसाठी खाद्यान्न, कोरोना लसीचे डोस( Covaxin doses ) तसेच आवश्यक जीवन रक्षक औषधांसह मानवीय मदतीसाठी भारत प्रतिबद्ध आहे. गत महिन्याच्या सुरूवातीला भारताने जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) माध्यमातून अफगानिस्तानला १.६ टन वैद्यकीय मदतीचा पुरवठा केला होता.

भारताकडून पुढील आठवड्यात अफगानिस्तारला गहु तसेच उर्वरित वैद्यकीय मदत पुरवण्यात येणार आहे. ही मदत पोहचवण्यासाठी परिवहन व्यवस्थेला अंतिम स्वरूप देण्यासाठी संयुक्त राष्ट्र एजेन्सी तसेच इतरांच संपर्कात असल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तालिबानने १५ ऑगस्टला काबुलवर कब्जा केल्यानंतर देश आर्थिक, मानवीय तसेच सुरक्षे संबंधी संकटाचा सामना करीत आहे.

हेही वाचलं का? 

 

 

Back to top button