मुंबई, पुढारी ऑनलाईन : अमेरिकेतील रोग नियंत्रण केंद्रांनी सांगितले आहे की, मागील आठवड्यात नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांमध्ये ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ३ टक्के होती. परंतु, आता ती ७३ टक्क्यांवर गेलेली आहे. कोरोनाच्या नव्या ओमायक्राॅन या व्हेरियंटमुळे घराघरांमध्ये कोरोना रुग्णांची आकडेवारीही हळुहळु वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ म्हणतात की, "कोरोनाची तिसरी लाट (Third wave of COVID )नक्की येईल. परंतु, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत त्याचे परिणाम गंभीर नसतील."
कोरोनाच्या नव्या ओमायक्राॅन व्हेरियंटच्या उत्पत्तीचा आणि संसर्गाचा वेग जास्त महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही जास्त आहे. या संसर्गाच्या वेगाला आरटी व्हॅल्यू असंही म्हणतात. एक आरटी व्हॅल्यू म्हणजे एक बाधित रुग्ण दुसऱ्या बाधित रुग्णाला तो आजार पसरवणे. (Third wave of COVID )
साथीच्या रोगाचे तज्ज्ञ डाॅ. गिरीधर बाबू ट्विटमध्ये मंगळवारी म्हणाले की, "१३ डिसेंबरच्या तुलनेत १९ डिसेंबरपर्यंत बिहार, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड, त्रिपूरा, तामिळनाडू, ओडिशा, मिझोराम, पश्चिम बंगाल, मनिपूर आणि नागालॅंड या राज्यांमध्ये आरटी व्हॅल्यूचा रेट वाढलेला आहे. १९ डिसेंबराला आरटी व्हॅल्यू रेट (Rt Value) ०.८९ इतका आहे", असंही त्यांनी सांगितलं आहे.
आरटी व्हॅल्यूचा वाढता आलेख पाहता राज्य सरकारच्या टास्कफोर्सचे सदस्य डाॅ. राहुल पंडीत म्हणाले की, "सध्या तरी घाबरण्याचे कोणतेच कारण नाही. आरटी व्हॅल्यूचा वाढता आकडा पाहता सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने जास्त खबरदारी घ्यायला हवी आणि काॅन्टॅक्ट ट्रेसिंग पुन्हा एकदा मजबूत करायला हवे", असे डाॅ. पंडीत यांनी सांगितले.
टास्क फोर्सचे दुसरे सदस्य शशांक जोशी म्हणाले की, "डेल्टामुळे तीन महिन्यांपूर्वी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता होती. मात्र, डेल्टापेक्षा पाचपट वेगाने पसरणाऱ्या ओमायक्राॅनच्या व्हेरियंटमुळे तिसरी लाट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे."
हेही वाचलं का?
पहा व्हिडीओ : अखेर कुत्र्यांची हत्या करणाऱ्या वानरांना केले जेरबंद…