

पुढारी ऑनलाईन डेस्क : Bra बाई, बुब्स या मुद्यावरून अभिनेत्री हेमांगी कवी हिने सोशल मीडियात वाचा फोडली. गेल्या आठवड्यापासून या मुद्यावरून दोन्ही बाजूने घमासान सुरु आहे.
अनेकांनी मनातील बोलली म्हणून प्रतिक्रिया मांडली तर काही लोकांनी या विरोधात जाऊन भूमिका मांडली. हा मुद्दा तापलेला असतानाच गिलीअन अँडरसन या हॉलिवुड अभिनेत्रीने Bra वर मांडलेली भूमिकाही चर्चेत आली.
अधिक वाचा
माझे स्तन बेंबीपर्यंत आले, तरी चालतील पण ब्रा घालणार नाही असा संकल्पच केल्याने तिने लाईव्ह सेशनमध्ये बोलताना गिलीअन अँडसनने सांगितले. त्यामुळे हेमांगीच्या मुद्याला आणखी बळ मिळाले.
आता ही चर्चा सुरु असतानाच अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस यांनी घेतलेली अशीच भूमिका आता समोर आली आहे. त्यांनी मार्च महिन्यात ब्रा वरून आलेला तिटकारा ट्विटरवरून व्यक्त केला होता.
त्यांनी ट्विट करून म्हटले होते की, मला ब्रा चा खूप तिरस्कार आहे. मला झुम बैठकीपूर्वी पाच मिनिटे मिळाली, तरी ब्रा चे भूत उतरवून टाकेन. मला त्याची काळजी अजिबात वाटत नाही.
अधिक वाचा
मीना हॅरिस यांनी केलेल्या ट्विटनंतर अनेक महिलांनी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता.
अनेक महिलांनी त्यांना येत असलेल्या अनुभवांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून कथन केले.
एका महिलेने आपला अनुभव शेअर करताना सांगितले की, मी पहिल्यांदा ज्यावेळी कामावर परत गेलो त्यावेळी ब्रा घातली होती. पण नंतर शपथ घेतली आणखी ब्रा घालायची नाही. मी सध्या स्पोर्ट्स ब्रा गर्ल आहे त्याचा तिरस्कार करते.
आणखी एका महिलेने प्रतिक्रिया देताना सांगितले की ऑनलाईन मीटिंगमध्ये मी ब्रा घालायचं सोडून दिलं आहे.
झुम मीटींगपूर्वी ब्रा घालण्याची गरज नाही हे आता नियम बुक केलं आहे. फक्त तुमची फ्रेम सेट करा.
मला दिवसाला ३ ते ५ मीटींग असतात, पण मी ब्रा घातलेली नाही. मला परत कॅम्पसमध्ये जावं लागेल तेव्हा माझी बॉडी कशी कृती करेल मला माहित नाही.
काही महिलांनी कोरोना लॉकडाऊनमुळे घरी असल्याने ब्रा घालायचे सोडून दिल्याचे सांगितले.
हे ही वाचलं का?
https://youtu.be/pwbK_–MP4s