अ‍ॅलर्जी, सर्दी, अस्थमाची औषधेही घटवतात कोरोना चा धोका | पुढारी

अ‍ॅलर्जी, सर्दी, अस्थमाची औषधेही घटवतात कोरोना चा धोका

लंडन : येथील क्‍वीन मेरी युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी मे 2020 ते फेब—ुवारी 2021 पर्यंत सहा हजार रुग्णांची एक पाहणी केली. त्यामधून त्यांना असे दिसून आले की अ‍ॅलर्जी, ताप, एग्जिमा, सर्दी-पडसे आणि अस्थमाचे (दमा) जे रुग्ण नियमितपणे औषधोपचार घेतात त्यांना कोरोना संक्रमणाचा धोका सुमारे 40 टक्क्यांपर्यंत कमी असतो.

ताप आणि एग्जिमाच्या रुग्णांमध्ये कोरोना संक्रमणाचा धोका सुमारे 25 टक्के कमी असल्याचे आढळले आहे. तसेच अस्थमाचे जे रुग्ण स्टेरॉईड इनहेलर्सचा वापर करतात त्यांनाही कोरोना संक्रमणाचा धोका 40 टक्क्यांपर्यंत कमी असतो. ‘थोरोक्स’ या मेडिकल जर्नलमध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठीच्या पाहणीत सर्व वंशाच्या लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते.

अर्थात हा पाहणीचा काळ डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटस्च्या आधीचा होता. त्यामुळे आता हे व्हेरिएंटस् असताना अ‍ॅलर्जी, ताप आणि अस्थमासाठी घेण्यात येणारी औषधे कोरोनाबाबत किती सुरक्षा देऊ शकतात हे स्पष्ट नाही. त्यामुळे लवकरच याबाबत एक नवे संशोधन केले जाणार असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. क्‍वीन मेरी युनिव्हर्सिटीचे डॉ. एडरियन मार्टिन यांनी सांगितले की दाट लोकसंख्या असलेल्या आशियाई लोकांमध्ये संक्रमणाचा धोका अधिक असतो. ते जरी अ‍ॅलर्जीची औषधे घेत असले तरी हा धोका कायम राहतो.

Back to top button