जपानमध्ये खरेच एलियन्स अवतरले? आकाशातील प्रकाश स्तंभांनी भीतीचे सावट | पुढारी

जपानमध्ये खरेच एलियन्स अवतरले? आकाशातील प्रकाश स्तंभांनी भीतीचे सावट

पुढारी ऑनलाईन डेस्क : जपानमधील टोट्टोरी या शहरात एक धक्कादायक बाब दिसून आली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला येथील आकाशात प्रकाशाचे नऊ स्तंभ येथील रहिवाश्यांना दिसले. या स्तंभाचे फोटो जपानमध्ये चांगलेच व्हायरल झालेले आहेत. या शहरात एलियन्स (परग्रहवासी) अवतरल्याची भीती येथील सोशल मीडियावर व्यक्त होऊ लागली आहे.

जपामनध्ये सर्वप्रथम ११ मेरोजी हे स्तंभ दिसून आले. अवकाशातील हे चित्र एखाद्या हॉलिवूडपटालाही थक्क करतील असे होते. हे फोटो माआशी नावाच्या एका व्यक्तीने एक्सवर पोस्ट केले. हा परिसर समुद्र किनाऱ्यापासून जवळ आहे. त्यानंतर totoro8201 या युजरनेही हा प्रकाश पाहिल्याचे सांगितले. या युजरनेह नारीईशी या समुद्रकिनाऱ्यावर असाच प्रकाश दिसल्याचे सांगितले. त्यानंतर हा प्रकाश कोठून आला याबद्दल तर्कवितर्क लढवले जाऊ लागले.

बऱ्याच युजरनी परग्रहवासीयांमुळे हा प्रकाश निर्माण झाल्याचे म्हटले. यानंतर या परिसरात भीतीची वातावरण निर्माण झाले.

नेमकी वस्तुस्थिती काय?

www.sunnyskyz.com या वेबसाईटने या प्रकरणावर खुलासा केला आहे. ही घटना एलियन्सशी संबंधित नसल्याचे या वेबसाईटने म्हटले आहे. समुद्रात मासेमारी करत असलेल्या बोटींना रात्री प्रखर प्रकाश झोत वापरावा लागतो. विशेषतः स्क्विड पकडण्यासाठी प्रकाशझोत टाकावा लागतो.

अशा वेळी जर तापमान फार कमी असेल आणि या बोटींच्या वरच्या बाजूला हवेत बर्फांचे क्रिस्टल असतील तर असे प्रकाश स्तंभ निर्माण होतात. दिसायला हे प्रकाशस्तंभ अत्यंत चित्ताकर्षक दिसतात. याला Isaribi असे नाव आहे. या घटनेचा आणि एलियन्सचा कसलाही संबंध नसल्याचे या वेबसाईटने म्हटले आहे.

हेदेखील वाचा –

Back to top button