‘आम्ही तुम्हाला गोळ्या घालू…’ : इस्‍त्रायलकडून हमासचा ‘तो’ व्‍हिडिओ शेअर | पुढारी

'आम्ही तुम्हाला गोळ्या घालू...' : इस्‍त्रायलकडून हमासचा 'तो' व्‍हिडिओ शेअर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इस्‍त्रायल आणि हमास यांच्‍यातील रक्‍तरंजित संघर्ष सात महिन्‍यांनंतरही सुरुच आहे. ७ ऑक्‍टोबर रोजी हमासच्‍या दहशतवाद्‍यांनी इस्‍त्रायलवर भीषण हल्‍ला केला होता. आता इस्‍त्रायलने दहशतवादी हल्ल्यादरम्यान हमासच्या दहशतवाद्यांनी सात इस्रायली महिला सैनिकांचे अपहरण केल्याचे ग्राफिक फुटेज शेअर केले आहे. हा व्हिडिओ होस्टेज फॅमिली फोरमने जारी केला असल्‍याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इस्रायल’ने दिले आहे.

७ आक्‍टाेबर २०२३ राेजी पाच महिला सैनिकांचे नहल ओझ तळावरून अपहरण करण्यात आले होते. या प्रसंगाचे हल्लेखोरांनी टिपलेले फुटेजमध्‍ये  लिरी अल्बाग, करीना एरिव्ह, आगम बर्जर, डॅनिएला गिलबोआ आणि नामा लेव्ही यांचे अपहरण झाल्‍याचे स्‍पष्‍ट करते. व्हिडिओमध्ये महिला सैनिकांना खाली जमिनीवर बसवले जात असल्याचे दिसत आहे. ओलिसांपैकी एक दहशतवाद्यांना सांगताना ऐकू येतो: “माझे पॅलेस्टाईनमध्ये मित्र आहेत. तुमच्यामुळे आमचे भाऊ मरण पावले, आम्ही तुम्हाला गोळ्या घालू,’ असे हमासचे दहशतवादी म्हणताना ऐकायला मिळतात.

“तू खूप सुंदर आहेस…”.

हमासच्या दहशतवाद्यांनी त्‍यांना भिंतीसमोर उभे केलेले या फुटेजमध्‍ये दिसत आहेत. त्यांचे हात बांधलेले असून काहींच्या चेहऱ्यावर रक्त आहे. एक दहशतवादी ओलिस महिला सैनिकांपैकी एकीला म्‍हणतो की, “तू खूप सुंदर आहेस”.या व्हिडीओमध्ये महिलांना एकामागून एक जीपमध्ये जबरदस्‍तीने बसवले जात असल्याचे दिसत आहे. महिला सैनिकांच्‍या सुटकेसाठी इस्त्रायली सरकारने तत्‍काळ वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी होस्टेज फॅमिली फोरमने हा व्हिडिओ जारी केला आहे.

ओलिसांच्‍या सुटकेसाठी इस्रायली सरकारने वाटाघाटी सुरु कराव्‍यात

अपहरण झालेल्‍या पाच सैनिकांच्‍या नातेाईकांनी म्‍हटलं आहे की, डॅनिएला, लिरी, नामा, करीना आणि इतर 123 ओलिसांचे 229 दिवस हमासच्‍या अत्‍याचाराला सामाेरे जात आहेत.  229 दिवसांपासून सोडण्यात आलेल्या ओलीसांना घरी आणण्यात देशाच्या अपयशाचा हा व्हिडिओ एक निंदनीय पुरावा आहे. इस्रायली सरकारने आणखी एक क्षणही वाया घालवू नये, आजच त्यांनी वाटाघाटी सुरु कराव्‍यात, अशी मागणीही होस्टेज फॅमिली फोरमने आपल्‍या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button