Mount Everest : नेपाळी सेना स्वच्छ करणार एव्हरेस्ट शिखर

Mount Everest : नेपाळी सेना स्वच्छ करणार एव्हरेस्ट शिखर
Published on
Updated on

काठमांडू : जगातील सर्वात उंच पर्वतशिखर एव्हरेस्टवरही Mount Everest मानवाने कचरा करून ठेवलेला आहे. आता नेपाळी सेना एका मोहिमेत एव्हरेस्टवर पडलेला सुमारे 10 टन कचरा गोळा करणार आहे. तसेच शिखरावरील पाच मृतदेहही खाली आणणार आहे. मेजर आदित्य कार्की यांच्या नेतृत्वाखाली 12 सदस्यांची टीम माऊंट एव्हरेस्ट, माऊंट ल्होत्से व माऊंट नुप्त्सेवरील कचरा गोळा करण्यासाठी 14 एप्रिलला एव्हरेस्ट बेस कॅम्पसाठी रवाना होईल. अठरा सदस्यांची शेरपा टीम या सफाई अभियानात सैन्याला मदत करील.

नेपाळी सैन्याचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल कृष्णप्रसाद भंडारी Mount Everest यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, 11 एप्रिलला काठमांडूमध्ये सैन्याचे प्रमुख जनरल प्रभुराम शर्मा हिरवा झेंडा दाखवून या टीमला रवाना करतील. बायोडिग्रेडेबल कचर्‍याला बेस कँपच्या खाली नामचे बाजारात आणले जाईल. त्याच्यावरील प्रक्रियेसाठी तो सागरमाथा प्रदूषण नियंत्रण समितीकडे सुपूर्द केला जाईल.

गैर-बायोडिग्रेडेबल कचरा व शव काठमांडूत आणले जातील. या सफाई अभियानामुळे हिमालयात मानवनिर्मित प्रदूषणाला नियंत्रित करण्यास मदत मिळेल. अलीकडच्या काळात एव्हरेस्टवर Mount Everest जाणार्‍या गिर्यारोहकांची संख्या मोठीच वाढली आहे. त्यामुळे या शिखरावर अनेक प्रकारचा कचरा निर्माण होत आहे. आता याबाबत नेपाळने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news