‘भारताचे लक्ष्‍य महासत्ता होण्‍याचे, तर आम्‍ही निधीसाठी भीक मागतोय’ : पाकिस्‍तान विरोधी पक्ष नेते फजलुर रहमान | पुढारी

'भारताचे लक्ष्‍य महासत्ता होण्‍याचे, तर आम्‍ही निधीसाठी भीक मागतोय' : पाकिस्‍तान विरोधी पक्ष नेते फजलुर रहमान

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आमचा शेजारचा देश भारताने जागतिक महासत्ता होण्‍याच्‍या प्रयत्‍नात आहे. तर पाकिस्‍तानची वाटचाल दिवाळखोरीच्‍या दिशेने सुरु आहे. आम्‍ही निधीसाठी भीक मागतोय, अशा शब्‍दांमध्‍ये पाकिस्‍तानमधील विरोधी पक्ष जमियत उलेमा-ए-इस्लाम पाकिस्तानचे प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांनी दोन्‍ही देशातील वास्‍तव जगासमोर मांडले. पाकिस्‍तान संसद अधिवेशनाच्‍या प्रारंभी ते बोलत होते.

पाकिस्‍तानमधील दिवाळखोरीला कोण जबाबदार?

ऑगस्ट १९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तानला एकत्र स्वातंत्र्य मिळाले. आज भारत जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहे, तर आपण दिवाळखोरी टाळण्यासाठी भीक मागत आहोत. याला जबाबदार कोण?” असा सवालही मौलाना फजलुर रहमान यांनी केला.

सत्ताधार्‍यांनी देशातील लोकशाही विकली

पाकिस्‍तानमध्‍ये नुकत्‍याच झालेल्‍या फजलुर रहमान यांनी टीका केली. त्यांनी सध्याच्या संसदेच्या वैधतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले, सत्ताधार्‍यांनी देशातील लोकशाही विकल्याचा आरोपही त्‍यांनी केला. तसेचया निवडणुकांमध्ये आणि देश चालविण्यात प्रशासन आणि नोकरशाहीची कोणतीही भूमिका नाही. ही कसली निवडणूक आहे जिथे हरणारे समाधानी नाहीत आणि जिंकणारे नाराज आहेत?” असा सवाल त्‍यांनी केला.

आपण फक्त कठपुतळी आहोत

अशा काही शक्ती आहेत जे आपल्यावर नियंत्रण ठेवतात, ते निर्णय घेतात जेव्हा आपण फक्त कठपुतळी आहोत, आम्ही किती काळ तडजोड करत राहू? किती काळ आम्ही आमदार म्हणून निवडून येण्यासाठी बाह्य शक्तींची मदत घेणार आहोत?, असा सवाल त्‍यांनी लोकप्रतिनिधींना विचारला.

पाकिस्‍तानला आंतरराष्‍ट्रीन नाणेनिधींकडून मदत

फेब्रुवारी २०२४ मध्ये पाकिस्‍तानमध्‍ये निवडणुका झाल्‍या होत्‍या. यावेळी कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेनाही. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एनने पीपीपीसोबत युती करून सरकार स्थापन केले आहे. या आघाडी सरकारचे नेतृत्व शेहबाज शरीफ करत आहेत. देश अभूतपूर्व आर्थिक संकटात सापडला आहे.आर्थिकदृष्‍ट्या कंगाल झालेल्‍या पाकिस्‍तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून $3 अब्ज डॉलरचे बेलआउट फंडिंग पॅकेज प्राप्त होत आहे. आयएमएफने सोमवारी आर्थिक निधीचा अंतिम भाग त्वरित वितरित करण्यास सहमती दर्शविली आहे. इस्लामाबाद आयएमएफकडून आणखी निधी मिळविण्याची योजना आखत आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button