पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर इराकमधील इराण समर्थित लष्करी तळावर साखळी बॉम्बस्फोट झाले. हे स्फोट इस्त्रायलने घडवून आणल्यचा इराणाच संशय आहे. या हल्ल्यात एक जण ठार आणि आठ जण जखमी झाल्याचा दावा इराणच्या गृहमंत्रालयाने केला आहे. तर लष्करी सूत्राने म्हलं आहे की, या हल्ल्यात तीन इराकी लष्करी कर्मचारी जखमी झाले आहेत.
इराकमधील सुरक्षा समितीचे सदस्य मुहन्नाद अल-अनाजी यांनी सांगितले की, बॅबिलोन गव्हर्नरेटच्या उत्तरेकडील महामार्गावरील अल-मश्रौ जिल्ह्यातील कलसू लष्करी तळावर झालेल्या स्फोटांची चौकशी सुरू आहे. इराणच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले की, या हल्ल्याच जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही. तसेच हा ड्रोन हल्ला होता की नाही, हेही आताच सांगता येणार नाही. स्फोटात उपकरणे, शस्त्रे आणि वाहनांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, हे स्फोट इस्त्रायलने घडवून आणल्यचा इराणाच संशय आहे. मात्र इस्रायल आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमास या दहशतवादी संघटनेने इस्त्रायलवर हल्ला केलाहोता. या हल्ल्यामागे इराणचा हात असल्याचा इस्त्रायलचा संशय आहे. इस्रायल आणि इराण यांच्यात या महिन्यात झालेल्या हल्ल्यांच्या मालिकेने सुरू असलेल्या गुप्त युद्धाचा पर्दाफाश केला आहे. दमास्कसमधील इराणच्या दूतावासावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात इराणच्या लष्कराच्या दोन प्रमुख कमांडरांसह सात जण ठार झाले. इराणने या हल्ल्याचा आरोप इस्रायलवर केला होता. इराणने इशारा दिला होता की, अशा प्रकारच्या हल्ल्यावर अधिक ताकदीने प्रत्युत्तर दिले जाईल. इराणने नुकतेच इस्रायलवर 300 हून अधिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला होता.
हेही वाचा :