ओमायक्राॅन : कॅनडाकडून इजिप्त, नायजेरिया, मालवी देशांतील प्रवाशांना मज्जाव | पुढारी

ओमायक्राॅन : कॅनडाकडून इजिप्त, नायजेरिया, मालवी देशांतील प्रवाशांना मज्जाव

ओट्वा (कॅनडा), पुढारी ऑनलाईन : ओमायक्राॅनच्या वाढत्या संसर्गामुळे जागतिक पातळीवर सर्व देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे. त्यामुळे अनेक देशांकडून युद्धपातळीवर निणर्यदेखील घेतले जात आहे. ओमायक्राॅन संसर्गाचा धोका उद्भवू नये म्हणून कॅनडाने इजिप्त, नायेजरिया, मालवी येथून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे.

कॅनडाचे आरोग्य मंत्री जीन-यवेस ड्युक्लोस यांनी म्हंटलं की, “आम्ही गेल्या शुक्रवारी प्रवाशांच्यावर बंदी यासंदर्भात ज्या देशांबद्दल बोललो, त्या देशांच्या यादीत मलावी, इजिप्त आणि नायजेरिया या देशांच्या समावेश केलेला आहे. या देशातून कॅनडामध्ये येण्यासाठी प्रवाशांवर बंदी घातलेली आहे”, अशी माहिती त्यांनी कॅनडाच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली.

“अमेरिकातील कॅनडावासियांच्या व्यतिरिक्त इतर देशांतून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची कॅनडाच्या विमानतळावर नव्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चाचणी केली जाईल. तसेच संबंधित प्रवाशांच्या लसीकरणासंबंधी जाणून घेतले जाईल”, असंही कॅनडाचे आरोग्य मंत्री जीन-यवेस ड्युक्लोस यांनी सांगितलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंगळवारी सांगितलं होतं की, “कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्राॅनचा संसर्ग वाढत असला तरी सर्व देशांनी शांत राहून ओमायक्राॅन संसर्गावर योग्य त्या उपाययोजना कराव्यात”, डब्ल्युएचओने आवाहन केले. या आवाहनानंतर कॅनडाने बाहेरून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेट्रोस अधानोम गॅब्रियसस यांनी सर्व देशांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, “आम्ही सर्व सदस्य राष्ट्रांना आवाहन करतो की, सर्वांनी तर्गसंगत आणि जोखीम कमी करण्याचा उद्देशाने उपाययोजना कराव्यात”, असे वृत्त अल जजिराने दिलेलं आहे. मागील आठवड्यात जेव्हा ओमायक्राॅनबद्दल दक्षिण आफ्रिकेने डब्ल्युएचओला सांगितलं. पण, त्यापूर्वीच ओमायक्राॅन या नव्या व्हेरियंट नेदरलॅंडमध्ये आलेला होता.

हे वाचलंत का ?

Back to top button