HIV AIDS जागृती सप्ताह : HIV वर अद्याप लस का नाही ? - पुढारी

HIV AIDS जागृती सप्ताह : HIV वर अद्याप लस का नाही ?

कोरोनासारख्या आजारावर संशोधकांनी काही महिन्यात व्हॅक्सिन शोधलं आहे. पण HIVवर गेली चार दशकं संशोधक लस शोधत आहेत, आणि अजूनही त्यात यश आलेले नाही. असे का झाले असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? याचं शास्त्रीय उत्तर HIV च्या रचने दडलेले आहे.

Medical News Today या वेबसाईटवर याची शास्त्रीय माहिती देण्यात आली आहेत, ती कारणे खालील प्रमाणे आहेत.

व्हायरसमध्ये होणारे बदल?

HIV याचा अर्थ Human Immunodeficiency Virus होय. हा व्हायरस स्वतःमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करतो. ज्या व्यक्तीला HIVची बाधा झालेली आहे, त्याच्या शरीरात HIVच्या वेगवेगळ्या रिप्लिका तयार होऊ शकतात.

व्हॅक्सिनचं काम असते की शरीरात एखाद्या विषाणू किंवा जीवाणू विरोधात रोगप्रतिकार शक्तीला गती देणे. HIV च्या एकाच शरीरात विविध रिप्लिका तयार होत असतात. य़ा रिप्लिका एक सारख्या असत नाहीत त्यामुळे व्हॅक्सिन त्या विरोधात निष्प्रभ होते.

व्हायरस वरील अवरण?

HIV वर ग्यालकोप्रोटिनचे अवरण असते. अवरण असलेल्या कुळातील हा व्हायरस आहे. ग्लायकोप्रोटिन याचा अर्थ साखर आणि प्रोटिनेचे अवरण होय. हे अवरण HIVचं शरीरातील अँटिबॉडिजपासून संरक्षण करतील

Back to top button