ब्रेकिंग : फेडरल रिझर्व्हचे व्याजदर जैसे थे; भारतीय शेअर बाजारावर होतील ‘हे’ परिणाम | Fed Rate

फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल
फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील महागाईचा दर २ टक्के इतका खाली आणण्याचे फेडरल रिझर्व्हचे उद्दिष्ट असल्याने व्याजदरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे अमेरिकेतील बेरोजगारीचा दर गेल्या दोन वर्षांतील जास्त असल्याने, विकासाचा मुद्दाही फेडरल रिझर्व्हने विचारात घेतला आहे. या निर्णयामुळे अमेरिकेतील व्याजदर ५.२५-५.५०%  इतका राहिला आहे. (Fed Rate)

अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हच्या पतधोरणाकडे जगाचे लक्ष लागून राहिलेले असते. गेल्या काही महिन्यात अमेरिकेत महागाईचा दर सातत्याने वाढता राहिल्याने फेडरल रिझर्व्हने व्याजदरात सातत्याने वाढ केली होती. अमेरिकेत सध्या गेल्या दोन दशकातील सर्वाधिक व्याजदर राहिलेले आहेत. अमेरिकेतील फेब्रुवारी महिन्यातील महागाईचा दर हा ३.२ टक्के वार्षिक इतका नोंदवला गेला आहे. हा दर ३.१ टक्के इतका खाली येईल असे अपेक्षित होते.

फेडरल रिझर्व्हच्या अधिकाऱ्यांच्या मते अमेरिकेच्या सुदृढ अर्थव्यवस्थेसाठी २ टक्के इतका महागाईचा दर अपेक्षित आहे. पण अमेरिकेत बेरोजगारीचा दर गेल्या दोन वर्षांतील सर्वांत जास्त असल्याने फेडरल रिझर्व्हला महागाईवर मात करत विकासावरही भर द्यावा लागणार आहे, असे लाईव्ह मिंटच्या बातमीत म्हटले आहे.

फेडरल रिझर्व्हची Federal Open Market Committee व्याजदरासंदर्भात निर्णय घेते. जोपर्यंत महागाई २ टक्केच्या उद्देशापर्यंत जाताना दिसत नाही, तोपर्यंत व्याजदरात कोणतीही कपात न करण्याच्या धोरणावर समिती ठाम आहे.

भारतीय शेअर बाजारावर काय परिणाम होईल? Fed Rate

फेडरेल रिझर्व्ह व्याजदारात कोणतीही कपात करणार नाही, असे गृहित धरून बाजाराची हालचाल राहिलेली आहे. पण फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष अर्थव्यवस्थेबद्दल आणि पुढील वाटचालीबद्दल काय बोलतात, काय विश्लेषण करतात, याकडे लक्ष असेल, असे मेहत इक्विटीचे विश्लेषण विभागाचे उपाध्यक्ष प्रशांत तापसे यांनी म्हटले आहे.

फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपातीचा निर्णय या वर्षीच्या मध्यावर घेईल, त्यामुळे बाजारात संमिश्र पडसाद उमटतील. भारतीय बाजारात सध्या अस्थिरता आहे. याचे कारण म्हणजे मीड अँड स्मॉल कॅफ स्टॉक्सचे बाजारमूल्य वाढले आहे, रिटेल गुंतवणूक घटलेली आहे, तसेच निवडणुका तोंडावर आहेत, असे लाईव्ह मिंटने म्हटले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news