राजू शेट्टी स्वतः पैठण येथे करणार ऊस दरासाठी आंदोलन | पुढारी

राजू शेट्टी स्वतः पैठण येथे करणार ऊस दरासाठी आंदोलन

पैठण; पुढारी वृत्तसेवा : स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि. २५) यंदाच्या गळीत हंगामातील ऊस दर जाहीर करावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. परंतु हे आंदोलन स्थानिक पोलिसांना हाताशी धरून दडपण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे आता या आंदोलनात स्वाभिमान शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी उतरणार आहेत. ते स्वतः पैठण येथे येऊन लवकरच आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

तालुक्यातील ऊस उत्पादकाच्या हितासाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे वतीने संत एकनाथ कारखान्यावर विविध मागण्यासाठी नियोजित आंदोलन करण्यात आले होते. परंतु हे आंदोलन स्थानिक पोलिसांच्या मदतीने चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. संघटनेचे युवा जिल्हा अध्यक्ष ज्ञानदेव मुळे यांनी हा प्रकार संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांना कळविला. मा. खा. राजू शेट्टी स्वतः शुक्रवारी (दि.२६) पैठण येथे येऊन कारखान्याच्या कार्यक्षेत्रात झालेल्या प्रकाराची माहिती घेतली. तसेच लवकरच पुढील आंदोलनाची दिशा ठरविले असून येथील आंदोलनामध्ये मी स्वतः सहभाग घेऊन ऊस उत्पादकाच्या हितासाठी लढा सुरूच राहणार असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली आहे.

यावेळी युवा जिल्हा अध्यक्ष ज्ञानदेव मुळे, उप जिल्हा अध्यक्ष शिवाजी साबळे, संतोष तांबे, बद्री बोंबले, पवन शिसोदे, सिद्धेश्वर उगले, भय्या झिरपे आदी उपस्थिती होते.

Back to top button