डोनाल्ड ट्रम्प यांचे मानसिक संतुलन बिघडलेय : निक्की हॅले | पुढारी

डोनाल्ड ट्रम्प यांचे मानसिक संतुलन बिघडलेय : निक्की हॅले

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याची टीका अमेरिकन भारतीय निक्की हॅले यांनी केली आहे. हॅले या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या शर्यतीत आहेत. न्यऐ हॅम्पशायर राज्यात मंगळवारी रिपब्लिकन पक्षाची निवडणूक होणार आहे.

हॅले म्हणाल्या की, ज्या देशाने आमच्या देशाला आणि जगाला कोरोनाच्या खाईत लोटले त्या चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची अनेकवेळा ट्रम्प यांनी कौतुक केले आहे. सध्या अमेरिकेची अवस्था खूपच खराब आहे. जगभरात वेगाने बदलत असताना आम्हाला विचार करावा लागेल की, बायडेन आणि ट्रम्प यांच्यासारख्या वृद्धांना कशासाठी निवडणून द्यायचे? देशाला तरुण आणि सक्रिय राष्ट्राध्यक्षांची गरज आहे.

ट्रम्प यांची मानसिक अवस्था चांगली नाही आहे. ते आता राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी पेलू शकत नाहीत, असे त्यांनी नमूद केेले.

Back to top button