शिकागोजवळ ८ जणांची गोळ्या झाडून हत्या | पुढारी

शिकागोजवळ ८ जणांची गोळ्या झाडून हत्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेतील शिकागोमध्ये रविवारी तीन ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने ८ जणांना गोळ्या घालून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली. इलिनोइसच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली. गोळीबार करणारा संशयित सध्या फरार आहे. रोमियो नॅन्स (वय २३) असे त्याचे नाव असून जोलिएट आणि विल काउंटी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

शिकागोजवळ दोन वेगवेगळ्या घरांमध्ये गोळीबार झाला यात ७ जणांचा तर अन्य एका ठिकाणी एकाचा मृत्यू झाला. जोलिएट, इलिनॉयमधील वेस्ट एकर्स रोडच्या २२०० ब्लॉकमध्ये हा गोळीबार झाला. या घटनेतील संशयित २३ वर्षीय नॅन्स या घरांजवळ राहत होता. हत्या झालेले लोक आणि संशयित व्यक्ती एकमेकांना ओळखत असतील, असा दावा देखील पोलिसांनी केला आहे.

अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ

अमेरिकेत गोळीबाराची ही पहिलीतच घटना नाही. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात गोळीबार आणि बंदुकीच्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गन वायलेन्स आर्काइव्हने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, जे अमेरिकन बंदूक हिंसाचाराच्या घटनांचा अहवाल देतात, जानेवारी महिन्यात आतापर्यंत गोळीबारात ८७५ हून अधिक मृत्यू या वर्षी झाले आहेत.

Back to top button