Google CEO Sundar Pichai | ‘या’ पर्यायांमुळे यावर्षी अनेकांच्या नोकऱ्या जातील, Google CEO सुंदर पिचाईंनी दिले संकेत | पुढारी

Google CEO Sundar Pichai | 'या' पर्यायांमुळे यावर्षी अनेकांच्या नोकऱ्या जातील, Google CEO सुंदर पिचाईंनी दिले संकेत

पुढारी ऑनलाईन : गुगल आणखी काही कर्मचाऱ्यांना धक्का देण्याच्या तयारीत आहे. कारण गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Google CEO Sundar Pichai) यांनी आणखी नोकरकपात सुरु असल्याची पुष्टी केली आहे. द व्हर्ज न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, पिचाई यांनी सर्व कर्मचार्‍यांना “२०२४ प्राधान्यक्रम आणि पुढील वर्ष” असे शीर्षक असलेला एक मेमो पाठवला आहे. त्यात त्यांनी नमूद केले आहे की Google कडे कठीण पर्याय आहेत. “आमची महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे आहेत आणि आम्ही या वर्षी आमच्या मोठ्या प्राधान्यक्रमांमध्ये गुंतवणूक करणार आहोत.”

त्यांनी पुढे म्हटले आहे की, “वास्तविकता ही आहे की या गुंतवणुकीची क्षमता निर्माण करण्यासाठी, आम्हाला कठोर पर्याय निवडावे लागतील.”

या कठोर पर्यायांमुळे अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत. पण, पिचाई यांनी नेमकी किती नोकरकपात होईल याची पुष्टी केलेली नाही. दरम्यान, त्यांनी हे स्पष्ट केले आहे की २०२४ मध्ये गेल्या वर्षीइतकी नोकरकपात होणार नाही. २०२३ मध्ये Google ने एकाच वेळी १२ हजार नोकरकपात केली होती. यामुळे गुगलमधील प्रत्येक टीममध्ये त्याचा प्रभाव जाणवला होता. ” पण आताची नोकरकपात मागील वर्षी एवढी नाही आणि प्रत्येक टीममधील नोकऱ्या जाणार नाही,” असे पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेमोमध्ये म्हटले आहे.

द व्हर्जच्या वृत्तानुसार, पिचाई यांनी सांगितले की, “काही भागात अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी आणि वृद्धीसाठी नोकरकपात केली जाईल.” त्यांनी कर्मचाऱ्यांना पुढे सांगितले, “यापैकी बरेच बदल आधीच जाहीर केले आहेत. जर आपल्याला पुढे राहायचे असेल तर काही टीम आवश्यकतेनुसार वर्षभर विशिष्ट संसाधन वाटपाचे निर्णय घेणे सुरू राहील आणि काही भूमिकांवर परिणाम होऊ शकतो,” असे त्यांनी लिहिले आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला Google ने AR/VR विभाग आणि विक्री विभागासह विविध टीम्समधील कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. पिचाई यांनी वेळमर्यादेची पुष्टी केली नसली तरी, त्यांच्या मेमोतून हे स्पष्ट होते की Google वर्षभर नोकरकपात करु शकते.

गेल्या वर्षी जेव्हा गुगलने नोकरकपातीची घोषणा केली होती, तेव्हा कर्मचार्‍यांचे भत्ते कमी केले होते.

हे ही वाचा :

Back to top button