पुढारी ऑनलाईन : कमकुवत जागतिक संकेत आणि हेवीवेट शेअर्समधील विक्रीच्या दबावामुळे आज गुरुवारी सेन्सेक्स ७१ हजारांच्या खाली आला तर निफ्टी २१,४०० च्या खाली घसरला. विशेषतः एचडीएफसी बँकेच्या शेअर्समधील विक्रीचा बाजारावर दबाव दिसून येत आहे. सकाळी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ७५० अंकांनी घसरून ७०,७४८ पर्यंत खाली आला. तर निफ्टी ३०० अंकांनी घसरून २१,३१४ पर्यंत खाली आला होता. त्यानंतर सकाळी १०.२३ वाजता सेन्सेक्स ४८३ अंकांच्या घसरणीसह ७१ हजारांवर आणि निफ्टी १७० अंकांनी घसरून २१,४०० वर व्यवहार करत होता. (Stock Market Updates)
सेन्सेक्सवर एशिनय पेंट्स, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, जेएसडब्ल्यू स्टील, एचडीएफसी बँक, मारुती, टाटा स्टील, विप्रो, टायटन, बजाज फायनान्स, आयटी हे शेअर्स टॉप लूजर्स होते. तर ॲक्सिस बँक, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स हे शेअर्स किरकोळ वाढले आहेत.
एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये घसरण सुरु आहे. दरम्यान, गेल्या दोन सत्रांमध्ये या शेअर्समध्ये जवळपास १२ टक्क्यांनी घसरण झाली आहे.
दरम्यान, आज गुरुवारी आशियाई बाजारांनी चांगली सुरुवात केली. MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा व्यापक निर्देशांक ०.१ टक्क्यांनी वाढला. चीनचा ब्लू-चिप स्टॉक निर्देशांक ३,२०४ अंकांपर्यंत खाली आला. या निर्देशांकाची २०१९ नंतरची निचांकी पातळी आहे. तर हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक १५,१८३ वर सुमारे १४ महिन्यांच्या निचांकी पातळीवर आला. (Stock Market Updates)
हे ही वाचा :