US : नर्सने फेंटॅनाइल IV च्या जागी दिले नळाचे पाणी; १० रुग्णांचा गेला जीव | पुढारी

US : नर्सने फेंटॅनाइल IV च्या जागी दिले नळाचे पाणी; १० रुग्णांचा गेला जीव

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेमध्ये ओरेगॉन रुग्णालयात नर्सने फेंटॅनाइल इंट्राव्हेनस (IV) औषधाच्या जागी नळाचे पाणी दिल्याने  १० रूग्णांना जीव गमवावा लागला आहे. न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, रूग्णालयातील एका कर्मचाऱ्याने औषधे चोरल्याचा संशय आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. रुग्णालय प्रशासनाने याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे.

या रूग्णालायातून फेंटॅनाइल (fentanyl IV) नावाच्या वेदनाशामक औषधाची चोरी झाली होती. ही चोरी पकडू नये यासाठी नर्सने बाटलीत नळाचे पाणी भरले. हे पाणी रुग्णांसाठी धोकादायक ठरले. ते दिल्यानंतर रुग्णांची प्रकृती बिघडली आणि संसर्गामुळे १० रूग्णांचा मृत्यू झाला.

रूग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याची तक्रार मृतांच्या नातेवाईंकांनी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सत्य समोर आले आहे. मात्र, औषधाऐवजी बाटलीत पाणी भरण्यासाठी हा प्रकार घडला याची पुष्टी झालेली नाही.

हेही वाचा : 

 

Back to top button